शेतकºयाचा मुलगा झाला आयईएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:01 IST2017-09-13T23:00:47+5:302017-09-13T23:01:18+5:30
मनात जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. हेच सिद्ध केले दर्यापूर येथील सूरज हरणे या विद्यार्थ्याने.

शेतकºयाचा मुलगा झाला आयईएस
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : मनात जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. हेच सिद्ध केले दर्यापूर येथील सूरज हरणे या विद्यार्थ्याने. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सूरजने देशात प्रतिष्ठेची मानली यूपीएससी-आयईएस परीक्षेत देशातून ४० वे रँकमध्ये गुण मिळवून कुटुंबासह शहराचे नाव उज्ज्वल केले.
दर्यापूर तालुक्यातील घडा या लहानशा गावात सूरजचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. प्रबोधन विद्यालयात इयत्ता १० व १२ वीत प्राविण्य श्रेणीत गुण मिळविणाºया सूरजने उच्च शिक्षणासाठी पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश घेतला. येथून बी.टेकची पदवी प्राप्त केली. आपण काहीतरी वेगळे करायचे अभियांत्रिकीमध्ये नाविण्याचा शोध घ्यायचा अन् त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी त्याने आयईएसची तयारी सुरू केली.
परिश्रम, सातत्य व लक्ष्य गाठण्याच्या जिद्दीने भारावलेल्या सूरजने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी-आयईएससारखी कठीण परीक्षा प्रथम प्रयत्नात यशस्वी केली. परीक्षेचा निकाल पाहताना त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, वडिलांची छाती अभिमानाने फुलली. शहरात व तालुक्यातही सर्वांनी सूरजच्या यशाचे कौतुक केले.
उपविभागीय अधिकारी सचिन हिरे व गाडगेबाबा मंडळाच्यावतीने गजानन भारसाकळे यांनी घडा येथे जाऊन सूरज व त्याच्या कुटुंबाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा व ग्रामगीता भेट देऊन येथोचित गौरव केला. आपल्या गावाचे व समाजाचे ऋण फेडायचे असल्याची भावना त्याने व्यक्त केली.