जैन मंदिरातील पुरातन मूर्ती चोरणारे अटकेत
By Admin | Updated: October 19, 2015 00:34 IST2015-10-19T00:34:15+5:302015-10-19T00:34:15+5:30
येथील शांतिनाथ दिंगंबर जैन मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वाजता चोरीला गेलेल्या पितळच्या पुरातन मूर्तींसह दोन अज्ञान नाबालिक आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात...

जैन मंदिरातील पुरातन मूर्ती चोरणारे अटकेत
परतवाडा : येथील शांतिनाथ दिंगंबर जैन मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वाजता चोरीला गेलेल्या पितळच्या पुरातन मूर्तींसह दोन अज्ञान नाबालिक आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे. दिगंबर जैन मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वाजता अज्ञात आरोपीने प्रवेश करून ई.स. १६०० मधील पितळच्या चार मूर्ती चोरून नेल्या होत्या. सायंकाळी अचानक झालेल्या मंदिरातील या चोरीने जैन समाजबांधवांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यासंदर्भात कमलचंद नेमीचंद जैन (रा.सिव्हील लाईन परतवाडा) पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अल्पवयीने आरोपींचा शोध चालविला होता. परतवाडा पोलिसांनी जोरदार शोध मोहीम राबवून कर्नाटनक राज्यातील बिल्दोरी जिल्ह्यातील थूगाव येथील दोन अल्पवयीन आरोपी आढळून आले. चौकशीत त्यांनी मूर्ती चोरीची कबुली दिली.
मंदिरात शिरून या अल्पवयीन आरोपींनी तेथील पुरतन चार मूर्ती लंपास केल्यात. जवळचे पैसे संपल्याने त्यांनी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. मूर्ती सापडल्यानंतर जैन बांधवांनी आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)