अपंग-मूकबधिरांचा आदर्श विवाह
By Admin | Updated: February 29, 2016 00:09 IST2016-02-29T00:09:06+5:302016-02-29T00:09:06+5:30
हल्ली सर्वत्र थाटामाटात होणारे विवाह सोहळे आपण बघतो.

अपंग-मूकबधिरांचा आदर्श विवाह
अंजनगाव सुर्जी : हल्ली सर्वत्र थाटामाटात होणारे विवाह सोहळे आपण बघतो. परंतु अंजनगाव सुर्जीत शहरवासी व ग्रामीण भागातील समाजसेवकांनी अपंग-मूकबधिरांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पाडला.
टाकरखेडा मोरे येथील ओमप्रकाश रामराव बहादुरे यांची इयत्ता सातवी उत्तीर्ण असलेल्या वैशाली नामक मुलीचा विवाह अंजनगाव येथील पंजाबराव बाळे यांचा मूकबधिर मुलगा विकास यांच्याशी वेदमंदिरात पार पडला. याप्रसंगी अपंग असलेल्या अजिंक्य परमेश्वर श्रीवास्तव, गणेश मुरलीधर, हाडोळे, वर्षा हाडोळे, शेषराव गोटू सुरत्ने, सुनीता सुरला, अ. सारीक अ. शहा हे सुध्दा विवाह बंधनात अडकले. यावेळी पुरोहिताची जबाबदारी रामाजी लांडे यांनी पार पाडली. त्यांनी वैदिक पध्दतीने जोडप्यांचे शुभमंगल केले. याप्रसंगी वधूला भेटवस्तू रुपात आंदनही देण्यात आले. यावेळी शहरातील गणमान्य अतिथींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)