शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागात ‘आयएएस’ विरुद्ध ‘नॉन आयएएस’, अपर आयुक्तांच्या बैठकीला पीओंची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 18:19 IST

आदिवासी विकास विभागात भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) विरुद्ध राज्य सेवेतील अधिकारी (नॉन आयएएस) असा वाद उफाळला आहे. त्याचा विपरीत परिणाम केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणा-या योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींचे विशेष साहाय्य अनुदान तीन वर्षांपासून अखर्चित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

- गणेश वासनिक 

अमरावती  - आदिवासी विकास विभागात भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) विरुद्ध राज्य सेवेतील अधिकारी (नॉन आयएएस) असा वाद उफाळला आहे. त्याचा विपरीत परिणाम केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणा-या योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींचे विशेष साहाय्य अनुदान तीन वर्षांपासून अखर्चित असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्याच्या ‘ट्रायबल’चा कारभार आयुक्तांच्या नियंत्रणात ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयातून चालतो. याशिवाय २९ प्रकल्प कार्यालये असून, येथे प्रकल्प अधिका-यांची (पीओ) नेमणूक केली जाते. काही प्रकल्प कार्यालयात आयएएस, तर काही ठिकाणी नॉन आयएएस पीओंची नियुक्ती करण्यात आली आहे.अमरावती येथे अपर आयुक्तपदाची धुरा शासनाने ‘नॉन आयएएस’ गिरीश सरोदे यांच्याकडे  सोपविली आहे. अपर आयुक्त सरोदे यांच्या अधिनस्थ सातपैकी तीन प्रकल्प कार्यालयांमध्ये ‘पीओ’ हे आयएएस आहेत. त्यामुळे आयएएस प्रकल्प अधिका-यांना ‘नॉन आयएएस’ अपर आयुक्त सरोदे यांच्या सूचना किंवा आदेश कमीपणाचे  वाटतात. परिणामी अपर आयुक्त सरोदे यांनी अमरावती येथे मंगळवार, २३ जानेवारी रोजी बोलाविलेल्या पीओंच्या आढावा बैठकीत दोन आयएएस प्रकल्प अधिका-यांनी दांडी मारली. यात किनवटचे अभिजित कुंभार व पांढरकवडा येथील एस. भुवनेश्वरी यांचा समावेश होता. मात्र, आयएएस असलेले धारणीचे प्रकल्प अधिकारी विजय राठोड हे योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अपर आयुक्तांनी बोलाविलल्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही स्थिती राज्यातील चारही अपर आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.

‘नॉन आयएएस’ यांची ‘एटीसी’ खुर्चीला पसंतीआदिवासी विकास विभागात अपर आयुक्तांचे पद हे ‘मलाईदार’ मानले जाते. एटीसीचा कारभार स्वीकारण्यासाठी आयएएस अधिकारी हे कधीही पसंती देत नाहीत. या पदावर नियुक्ती झालेले अधिकारी कार्यकाळ कधी संपेल, याची प्रतीक्षा करतात. मात्र, नॉन आयएएस अधिकारी अपर आयुक्तपदासाठी थेट मंत्रालयातून ‘फिल्डिंग’ लावतात. नागपूर अपर आयुक्त माधवी खोडे वगळता नाशिक येथील गावळे, अमरावतीचे गिरीश सरोदे हे ‘नॉन आयएएस’ आहेत. प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकांना आदिवासी विकास विभागातील थेट आयएएस अधिकारी जात नाहीत, असाही संघर्ष सध्या रंगत आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र