शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर अन्याय झाला; सुवर्णपदकप्राप्त महिला आरएफओची वनमंत्र्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:35 IST

Amravati : नियमबाह्य व बेकायदेशीर निलंबन आदेशावर अपील करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वने आणि वन्यजीव संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या धुळे-नवापूर येथील वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) स्नेहल अवसरमल यांचे नियमबाह्य व बेकायदेशीर निलंबन झाल्याप्रकरणी त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निलंबन आदेशावर अपील करण्याची मागणी केली आहे. हे निलंबन महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाविरोधात असल्यामुळे आरएफओ अवसरमल यांचे म्हणणे असून, त्यांनी न्यायासाठी वनमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

महिला आरएफओ स्नेहल अवसरमल यांना मुंबई येथे जागतिक वनदिनानिमित्त २१ मार्च २०२५ रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. मात्र कामात अनियमितता, अपहार झाल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आले आहे. तक्रारदार लेखापाल हे दोन वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाले असून, वरिष्ठांनी कामांची घटनास्थळी पाहणी केली आहे. वस्तुनिष्ठ अहवालदेखील सादर करण्यात आला होता. यंदा प्रशासकीय बदलीस पात्र असाना मुद्दामहून ३१ मे २०२५ रोजी निलंबनाने आदेश निर्गमित करण्यात आले, असे आरएफओ स्नेहल अवसरमल यांनी वनमंत्री नाईक यांना ३१ मे रोजी पाठविलेल्या विनंती पत्रात नमूद केले आहे. झालेले बेकायदेशीर निलंबन आदेश आणि तक्रारीच्या अनुषंगाने वास्तव जाणून घेत याविषयी अपील घेऊन न्याय प्रदान करावा, अशी मागणी महिला आरएफओ अवसरमल यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.

आरएफओ अवसरमल यांच्यावर नवापूर प्रादेशिकमध्ये २६ लाख ६१ हजार २३० रुपये, तर रोहयोत १८ लाख ४६ हजार ९२ रुपये असे एकूण मिळून ४५ लाख १७ हजार ३२२ रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, धुळे येथील वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

'मॅट'चे आदेश पायदळी तुडविलेवनक्षेत्रपाल हे पद राजपत्रित संवर्गातील वर्ग २ चे पद आहे. या पदाचे नियुक्त अधिकारी हेच शिस्तभंगविषयक प्राधिकृत अधिकारी आहेत. असे असताना धुळे येथील वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज यांनी आरएफओ स्नेहल अवसरमल यांना शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि वित्तीय अनियमितता केल्याप्रकरणी ३० मे रोजी निलंबनाचे आदेश निर्गमित केले. ही बाब महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई (मॅट) यांच्या आदेशाविरोधात आहे. आरएफओच्या निलंबनाचे आदेश वनसंरक्षकांना काढण्याचे अधिकार नाहीत, असे आरएफओ अवसरमल यांनी वनमंत्री नाईक यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभागGanesh Naikगणेश नाईक