शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या नावाचं मी इनिशल टॅटूनं गोंदलं! अल्पवयीन मुलीला गुलाब देऊन केले ‘प्रपोझ’, नागरिकांनी बदडले

By प्रदीप भाकरे | Updated: March 1, 2023 17:32 IST

Amravati News सैराटमधील झिग झिंग झिंगाट या ओळी वास्तवात उतरू पाहण्याचा मनसुबा घेऊन तो थेट एका मंदिरात पोहोचला. तेथे बसलेल्या मुलीला त्याने प्रपोझही केले. मात्र हाय रे दैव. तिला ते पसंत पडले नाही. मग काय ती ओरडली. अन् त्याला मंदिरातील नव्हे तर नागरिकांकडून यथेच्छ प्रसाद मिळाला.

प्रदीप भाकरेअमरावती: आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं, हात भरून आलोया, लई दुरून आलोया, आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया, आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया, झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट’ सैराटमधील या ओळी वास्तवात उतरू पाहण्याचा मनसुबा घेऊन तो थेट एका मंदिरात पोहोचला. तेथे बसलेल्या मुलीला त्याने प्रपोझही केले. मात्र हाय रे दैव. तिला ते पसंत पडले नाही. मग काय ती ओरडली. अन् त्याला मंदिरातील नव्हे तर नागरिकांकडून यथेच्छ प्रसाद मिळाला.

             गाडगेनगरमधील एका मंदिरात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी सातच्या सुमारास चेतन संजय नागिदवे (२२, रा. चिंचखेड, ता. अमरावती) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, आरोपी संजय हा या मुुलीचा नेहमीच पाठलाग करून तिला त्रास देतो. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ती अल्पवयीन मुलगी गाडगेनगर ठाण्याच्या हददीतील एका मंदिरात तिच्या मैत्रिणीसोबत भोजन करून होमवर्क करत होती. ती रोज त्या मंदिरात भोजनाचा डबा खाऊन मग एसटीने गावाकडे जाते, हा दिनक्रम आरोपीला माहित असल्याने मंगळवारी दुपारी तो त्या मंदिरात पोहोचला. हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने तिला प्रपोझ केले. तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझे नाव माझ्या हातावर देखील गोंदले आहे. असे म्हणून त्याने तिचा विनयभंग केला. 

पोलिस आले न् घेऊन गेलेअचानक पुढ्यात येऊन थेट गुलाबाचे फुल देत छेड काढल्याने ती अल्पवयीन मुलगी चांगलीच घाबरली. त्यामुळे ती जीवाच्या आकांताने ओरडली. तो आवाज बाहेरच्या नागरिकांपर्यंत पोहोचला. तिच्या मैत्रिणींनीही मदतीसाठी हाक दिली. एक तरूण मंदिरात शिरून एका अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी चेतनला चांगलाच चोप दिला. तेवढयात गाडगेनगर पोलीसही तेथे पोहोचले. जमाव बदडत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. तर पिडित वडिल व मोठ्या बहिणीला बोलावून घेतले. सुमारे एकतास तो ड्रामा चालला. प्रपोझएैवजी त्याला किक मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग