बाळा़़़परत ये मी वाट पाहते !
By Admin | Updated: October 17, 2015 00:16 IST2015-10-17T00:16:02+5:302015-10-17T00:16:02+5:30
मागील ३०० वर्षांपूर्वीचे जागृत स्थान व पंच शक्तीने नटलेल्या मंगरूळ दस्तगीर येथील मंगला देवीचे हे पुरातन मंदिर प्रसिध्द आहे़ बाळा परत ये मी वाट पाहते, ...

बाळा़़़परत ये मी वाट पाहते !
जागृत देवस्थान : मंगरुळ दस्तगीर येथील जागृत मंगला मातेचे पुरातन मंदिर
धामणगाव रेल्वे : मागील ३०० वर्षांपूर्वीचे जागृत स्थान व पंच शक्तीने नटलेल्या मंगरूळ दस्तगीर येथील मंगला देवीचे हे पुरातन मंदिर प्रसिध्द आहे़ बाळा परत ये मी वाट पाहते, अशी हाक प्रत्येक भाविकाला देणारी मंगला माता म्हणून ओळखली जाते़
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंगला देवी मंदिर आहे़ या मंदिराविषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगण्यात येतात़ मागील साधरणत: तीनशे वर्षांपूर्वी येथील कोणी भक्त नवरात्रात माहूरला रेणुका मातेच्या दर्शनास जात होता़ पुढे वृध्दावस्थेमुळे जाऊ शकत नसल्याने तो फार दुखी झाला. रेणुकामाता म्हणाली 'तू चिंता करू नकोस, तुझ्या गावाला येते़ एक सदपुरूष यामार्गे जात असता त्याच्या नित्य पुजेतील रेणुकाआईचा तांदळा मुखवटा येथे मंगलधाम परिसरात राहिला पुढच्या मुक्कामी मुखवटा नसल्याचे लक्षात आल्यावर तो परत या भागात आला असता रेणुकाईने मी आता येथेच राहणार असल्याचे सांगितले़ तो प्रगटदिन चैत्र शुध्द चतुर्दशीचा होता. तेव्हापासून आजही चैत्र शु़१४ ला दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो़ या मंगलामातेला भवानीमाता सुध्दा म्हणतात. हे स्थान माहूर क्षेत्राचे उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरच्या रेणुकाईचा केलेला नवस येथे फेडला जातो, अशी श्रध्दा आहे़
या मंदिरात अनेक संतांनी भेटी दिल्यात रा़स्व़चे गोवलकर गुरूजी, शिलानंद सरस्वती, सोनईचे हिरहरानंदनाथ महाराज यांनी या मंदिरात येऊन मंगलादेवी मूर्तीचे दर्शन घेतले होते़ माहूरच्या प्रणिता नदीचे जल येथील विहिरीत असल्यामुळे ही विहीर प्रणितातिर्थ आहे़ या विहिरीतील जलाने स्रान केल्यास शारीरिक व मानसिक रोग नाहिसे होतात़ तसेच हे स्थान माहूरचे उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरला केलेला नवस येथे पूर्ण केला जातो, अशी परिसरातील भाविकांची श्रध्दा आहे़ मागील अनेक वर्षांपासून भाविकांची येथे गर्दी वाढली आहे़
मंगरूळ दस्तगीरची मंगला माता अनेक घराण्यांची कुलदैवत आहे़ मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते़ ई़स़१९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघ चालक गोवलकर गुरूजी मंगरूळची संघ शाखा पाहण्याकरिता दैऱ्यावर आले होते़ पुढे नागपूरचे पूर्वाश्रमीचे खेळकर म्हणजे स्वामी शिलानंद स्वरस्वती हे सन्यास घेतल्यानंतर साधना करण्याकरिता मंगरूळला आले होते़ या मंदिराचा अधिक विकास व्हावा याकरिता एऩजी़ उपाख्य बाबुराव देशपांडे यांनीही अथक परिश्रम घेतले़ भाविकांच्या हाकेला पावणारी मंगलामाता म्हणून आजही प्रसिध्द आहे़ नवरात्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ मागील चार दिवसांपासून येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत़