माझ्या कामाची पद्धत खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात
By Admin | Updated: April 30, 2016 00:13 IST2016-04-30T00:13:18+5:302016-04-30T00:13:18+5:30
माझ्या कामाची शैली, पद्धत ज्यांना खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात. मला सर्वांचा आदर आहे, ...

माझ्या कामाची पद्धत खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात
अमरावती : माझ्या कामाची शैली, पद्धत ज्यांना खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात. मला सर्वांचा आदर आहे, मी कुणाचे नाव घेणार नाही, कुणाला उत्तर देण्याची गरज नाही, मी सक्षम आहे, ज्या दिवशी उत्तर द्यायचे आहे ते आपल्या समक्ष देईल, असा थेट प्रहार पालकमंत्र्यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत विरोधकांवर केला.
आ.रवी राणा यांचे नाव न घेता तसेच यापूर्वी त्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना पालकमंत्री म्हणाले, लोकांना भ्रमित करणे, यासाठी काही वाटप करणे ही त्यांची पध्दत मला याविषयी अधिक बोलायचे नाही. मला लोकांना न्याय द्यायचा आहे. दीड वर्षात दीड लाख लोकांच्या तक्रारी, समस्या ठेवून घेतल्या आहेत. मला लोकांना न्याय द्यायचा आहे. ज्या दिवशी मी लोकांना न्याय देऊ शकणार नाही त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मी व्यापारातून राजकारणात आलो आहे ते मात्र राजकारणातून व्यापार करीत आहेत, राजकारणाचा व्यापार करीत आहे, मी राजकारणात व्यापारातला पैसा खर्च करीत आहे, शेतकऱ्यांना ४०५ गीर जातीच्या दुधाळू गायी स्वत:जवळून वाटल्या, आता ५ हजार बकऱ्यांच वाटप करणार आहे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहीला पाहिज, असा आपला ध्यास आहे. मला मतदारांना समाधानी ठेवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला समाचार
तेव्हा झोपी गेले होते काय ?
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या त्याकाळी अल्प भावात जमिनी घेण्यात आल्यात. आता तोंड उघडणारे त्यावेळी झोपी गेले होते काय, अशा पद्धतीने विरोधकांचा खरपूस समाचार पालकमंत्र्यांनी घेतला.
बडी शहर में छोटी छोटी बाते होती है
माझ्या राजकारणाची उंची मला माहीत आहे. पहिला एकटाच होतो, आता लाखो जुळले आहे. आता त्यांना माझी भीती निर्माण झाली आहे. मला याविषयी अधिक बोलायचे नाही. स्व.आर.आर.पाटलांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास 'बडे शहर मे छोटी, छोटी बाते होती है' असे पालकमंत्र्यांनी सांगितले.