पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:30+5:302021-09-24T04:14:30+5:30
इंदल चव्हाण-अमरावती : कामाची व्यस्तता, वाहनांचा प्रचंड वापर, कोरोनाकाळातील संचारबंदीत अकारण बाहेर फिरण्यावरील बंदी आदी अनेक कारणांमुळे पायी चालण्याची ...

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी लागली
इंदल चव्हाण-अमरावती : कामाची व्यस्तता, वाहनांचा प्रचंड वापर, कोरोनाकाळातील संचारबंदीत अकारण बाहेर फिरण्यावरील बंदी आदी अनेक कारणांमुळे पायी चालण्याची लोकांची सवयच मोडली आहे. त्यामुळे नको त्या वयात गुडघा, कंबरदुखीची घरघर लागली आहे. या आजाराने सध्या अनेकजण त्रस्त असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञांनी सांगितले.
भाजीपाला आणण्याकरिता नागरिकांना दुकानात जावे लागत होते. त्यामुळे जवळपासच्या दुकाना पायी जाणे होत होते. लहान मुलांना शाळेत ने-आण करताना महिलांचा पायी जावे लागायचे. ज्येष्ठ वा मध्यमवयीन सकाळ-सायंकाळ वाॅकिंगकरिता जायचे. मात्र, कोरोनाकाळात संपर्क तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. तेव्हा बहुतांश नागरिकांना घरीच थांबावे लागले. त्यामुळे अनेकांची चालण्याची सवय मोडली. त्यामुळे आता सकाळी उठून फिरायला जाण्याची काही लोकांची सवय पूर्णत: मोडली. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी वाहनाचा वापर वाढविल्याने त्यांना फिरण्यास वेळच मिळत नाही. कार्यालय ते घर वाहनावरच प्रवास होत असल्याने त्यांचे पायी चालणे बंदच झाले. अनेकांनी वर्षोगिणती सायकलीवर पाय टाकलेला नाही. त्यामुळे शरीराचा व्यायाम न झाल्याने नको त्या वयात कंबरदुखी, गुडघादुखीचा त्रास वाढीस लागला आहे.
पॉईंटर
एक किमी परिसरात जाण्यास वाहनाचा वापर टाळा.
कुठलेही काम करताना सहकार्याची मदत कमी घ्या.
घाई नसेल तर लिफ्टऐवजी पायऱ्यांनी घर गाठा.
कार्यालयापर्यंत शतपावली करावी.
बॉक्स
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही त्यांनी हे करा
घरातच शरीराची हालचाल होईल, असे व्यायाम करावे. तेही शक्य नसल्यास दुसऱ्याच्या सहकार्याने शतपावली करावी.
हाता-पायाच्या नसा मोकळ्या होतील, अशा उपकरणांच्या साह्याने हालचाल करावी. यामुळे चयापचय होते, वजन कमी होण्यास मदत होते, फुफ्फुसाची क्रिया वाढते, मन प्रसन्न होते, असे आर्थोपेडिक डॉ. संजय पवार यांनी सांगितले.