शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं - ॲड. प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:18 IST

अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे. ठाकरे यांचे फायनल झाले की घोषणा होईल. ठाकरे यांना वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊ. त्यांची बोलणी झाली की मग निर्णय घेऊ. मात्र, मी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत बोलत नाही, त्यांना गरज असेल तर आमच्याशी बोलावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अमरावती येथे मांडली.

ॲड. प्रकाश आंबेडकर हे अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकार यांच्या प्रचारार्थ बैठकीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीला तिसरे इंजिन लावू. मग ते राष्ट्रवादीचे असेल की मनसेचे लावणार, हे येणारा काळच सांगेल. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेले होते. आम्ही त्यांना नाकारलेले नाही, आम्ही केवळ दलितांपूर्वी पुरते मर्यादित राहावे, अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे. ती आम्हाला मान्य नाही, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास आमचा विरोध नाही, असेही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, महिला प्रदेशाध्यक्ष निशा शेंडे, धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष शैलेश गवई आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAmravatiअमरावती