'मी शासकीय कर्मचारी आहे, गुन्हे दाखल करेन!'
By Admin | Updated: October 7, 2015 01:27 IST2015-10-07T01:27:08+5:302015-10-07T01:27:08+5:30
'मी शासकीय कर्मचारी आहे, गुन्हे दाखल करीन', 'हॉर्न वाजविता, दंड ठोेकीन', वाहतूक नियंत्रणाच्या कर्तव्याची धुरा ज्यांच्या शिरावर आहे, ...

'मी शासकीय कर्मचारी आहे, गुन्हे दाखल करेन!'
व्हटकरांच्या राज्यात हे काय? : वाहतूक पोलिसांच्या वाहनचालकांना बेछूट धमक्या!
अमरावती : 'मी शासकीय कर्मचारी आहे, गुन्हे दाखल करीन', 'हॉर्न वाजविता, दंड ठोेकीन', वाहतूक नियंत्रणाच्या कर्तव्याची धुरा ज्यांच्या शिरावर आहे, त्या वाहतूक पोलिसांनी भर चौकात एका जबाबदार वाहनचालकाला दिलेल्या या धमक्या होत. पंचवटी चौकात मंगळवारी सकाळी १०.१५च्या सुमारास गृहमंत्र्यांच्या आजोळी घडलेला हा प्रकार म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची बिहार पोलिसांच्या दिशेने केलेली वाटचाल म्हणायची काय?
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वारंवार इच्छा प्रदर्शित करणाऱ्या पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या कारकिर्दीत सतत घडणारे असले प्रकार बघून 'व्हटकरांच्या राज्यात हे काय,' असा सवाल उपस्थित होतो.
वेळ सकाळी १०.१५ ची. स्थळ कौटुंबिक न्यायालयाकडून येणाऱ्या रस्त्यावरील पंचवटी चौक. वाहनांचा मोठा ओघ असतानाही नेहमीप्रमाणे अवघा रस्ता तुंबलेला. डावीकडे जाणारी वाहने विनाकारण थांबलेली. सिग्नल हिरवा होतो. काही वाहने निघतात. सिग्नल पुन्हा 'रेड' होतो. डावे वळण घेऊ इच्छिणारी मागे उभी असलेली वाहने प्रतीक्षेतच राहतात. हॉर्न वाजवून वाहनचालक तैनात वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधू इच्छतात. बघूनही पोलीस न बघितल्यासारखे करतात. अखेर तिसऱ्यांदा सिग्नल ग्रीन झाल्यावर नाहकच मानसिक त्रास सहन केलेल्या वाहनांपैकी एक वाहनचालक तैनात वाहतूक पोलिसाला डावे वळण मोकळे ठेवण्याबाबत सूचना करतात.