शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विद्यापीठ परीक्षेत फेल; मर्जीतील एजन्सी नेमणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 5:00 AM

अंतिम वर्षाच्या परीक्षा सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाल्यात. मात्र, सुरूवातीपासून ॲप डाऊनलोड, लॉगीनची समस्या कायम होती. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील परीक्षा बारगळल्या. त्यानंतर १० ते ११.३० वाजता या दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षांमध्येही तांत्रिक समस्या कायम होती. त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षार्थ्यांना लॉगीन आयडी मिळू शकले नाही. तिसऱ्या शिफ्टमधील दुपारी १ ते २.३० वाजताच्या परीक्षेतही लॉगीन आयडीची समस्या होती.

ठळक मुद्देतांत्रिक समस्यांनी विद्यार्थी तणावात : चारही शिफ्टमधील परीक्षांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अडथळ्यांची शर्यत पार करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पदध्तीने मंगळवारपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेत विद्यापीठ ह्यफेलह्ण झाले. परीक्षेसाठी नेमलेल्या नागपूर येथील एका एजन्सीकडे ऑनलाईनासाठी पायाभूत सुविधा नसतानादेखील जबाबदारी दिली कशी, असा सवाल आता उपस्थीत होत आहे. लॉगीन आयडी, ॲप डाऊनलोड, हॉलतिकीटची समस्या कायमच राहिल्याने परीक्षेच्या पहिल्या दिवशी साराच गोंधळ उडाला.अंतिम वर्षाच्या परीक्षा सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाल्यात. मात्र, सुरूवातीपासून ॲप डाऊनलोड, लॉगीनची समस्या कायम होती. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील परीक्षा बारगळल्या. त्यानंतर १० ते ११.३० वाजता या दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षांमध्येही तांत्रिक समस्या कायम होती. त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षार्थ्यांना लॉगीन आयडी मिळू शकले नाही. तिसऱ्या शिफ्टमधील दुपारी १ ते २.३० वाजताच्या परीक्षेतही लॉगीन आयडीची समस्या होती. ऑनलाईन परीक्षेचे नेमके काय सुरू आहे, हे विद्यार्थ्यांना काहीही कळू शकले नाही. हॉल तिकीटमध्ये त्रुटी सोडविण्यासाठी मंगळवारी ३ वाजतापर्यंत बरेच विद्यार्थी धडकले. ३.३० ते ५ पर्यंत समस्या कायम होती. विद्यार्थी दिवसभर तणावात होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, मनीषा काळे, डब्लू. व्ही. निचित आदींनी परीक्षा विभागात तोडगा काढण्यासाठी बराच वेळ दिला. ६ हजार ७०० विद्यार्थ्यांना लॉगीन तर, ३० हजार विद्यार्थी सर्व्हरवर होते, असा दावा विद्यापीठाने केला आहे.बुधवारीच्या परीक्षा स्थगित, नंतरच्या होणार नियमितविद्यापीठाने बुधवार, २१ ऑक्टोबर रोजीच्या विविध शाखांच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला, यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी उशिरा जारी केले आहे. मात्र, २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर यादरम्यानच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी ऑफलाईन व ऑनलाईन अश दोनही परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा ८ नोव्हेंबर पूर्वीच घेण्यात घेण्यात येतील. पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्याननी मंगळवारी दिलेली परीक्षा ग्राह्य समजली जाईल, असे कळविले आहे.बडनेरा येथील आरडीआयके व के.डी. महाविद्यालयात रात्री ८ वाजेपर्यंत ऑफलाईन परीक्षा घ्यावी लागली, अशी माहिती केंद्रप्रमुख सतेश्र्वर मोरे यांनी दिली.एलएलएम तृतीय सेमिस्टरचा पेपर सकाळी १० ते ११.३० वाजता होता. सायंकाळी ५ वाजता लॉगीननंतर हा पेपर ६.३० वाजता अपलोड केल्याची माहिती माजी महापौर तथा परीक्षार्थी किशोर शेळके यांनी दिली.होय... आम्ही लॉगिन केलेपरतवाडा येथील स्व. सी.एम. कढी कला महाविद्यालयात काही विद्यार्थी एकत्रित आले आणि ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी करू लागले. मात्र, प्राचार्यांनी तुम्ही लॉगीन केले नसेल, अशी विचारणा विद्यार्थ्यांना केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोबाईल उंचावून लॉगीन केल्याचा पुरावा दाखविला. त्यानंतर प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेतली.एजन्सीकडे पायाभूत सुविधांचा अभावविद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेची जबाबदारी सोपविलेल्या नागपूर येथील ह्यप्रोमार्कह्ण नामक एजन्सीकडे पायाभूत सुविधा नसताना करारनामा कसा केला, हा विषय चिंतनीय आहे.गत काही दिवसापूवी नागपूर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेबाबत आलेला अनुभव बघता अमरावती विद्यापीठाने काहीही बोध घेतला नाही.पहिल्या शिफ्टमध्ये ३ हजार विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. अचानक ९ वाजता सर्व्हर डाऊन झाले. ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक समस्या उद्‌भवल्या. दुपारी १ वाजता सर्व्हरची समस्या दूर करण्याचे प्रयत्न झाले. हळूहळू लॉगीन मिळाले.-हेमंत देशमुख,संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.या तांत्रिक समस्यांनी वैतागले विद्यार्थीॲप डाऊनलोड, लॉगीन आयडी, एक्साम स्टार्ट, ईनव्हॅलिड यूझर आयडी, लिंक नॉट ओपन, समथिंग वेट रॉंग, ॲप ओपनची भानगड, हॉलतिकीट दुरूस्तीनंतरही त्रुटी कायम, एक्झाम स्टार्ट, नो शेडुल्ड नाऊ या विविध तांत्रिक समस्यांनी विद्याथी वैतागले होते.अन् त्याने सहाऐवजी दिली पाचव्या सेमिस्टरची परीक्षाबी.ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरला असलेल्या मुलाला पाचव्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागली, असा अफलातून अनुभव मंगळवारी आल्याची माहिती गणेश हलकारे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. प्रश्नपत्रिका पाचव्या सेमिस्टरची असल्याबाबत प्राचार्यांना कळविण्यात आले. परंतु, प्राचार्यांनी तीच सोडवा आणि अपलोड करा, असा सल्ला दिल्याचे हलकारे म्हणाले. त्यामुळे विद्यापीठात परीक्षेचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते. हेल्पलाईनवरही वारंवार संपर्क साधला असता, दोन्ही क्रमांकांवर तो होऊ शकला नाही, असे हलकारे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा