अमरावती जिल्ह्यात पती पत्नीची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 10:50 IST2019-08-07T10:50:09+5:302019-08-07T10:50:32+5:30
मोल मजुरी करणाऱ्या पती - पत्नीने गरिबीला कंटाळून राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वºहा येथे मंगळवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.

अमरावती जिल्ह्यात पती पत्नीची गळफास लावून आत्महत्या
सूरज दाहाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोल मजुरी करणाऱ्या पती - पत्नीने गरिबीला कंटाळून राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वºहा येथे मंगळवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.
नरेश श्रीराम मलकाम (४०) व पूजा नरेंद्र मलकाम (३२) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. या दोघांना एक मुलगा ओम (५) व एक मुलगी (७ ) जान्हवी आहे, या दोघांनी आपल्या राहत्या घरात दोन वेगवेगळे दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार मलकाम कुटुंब हे चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथून ७ वर्षांपासून वºहा येथे राहायला आले होते. दोघेही शेतात काम करून आपला संसार चालवत होते. मात्र आज अचानक त्यांनी दोन्ही मुला - मुलींना सोडून जीवनयात्रा संपवीली. कुºहा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र या दोघांच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेने दाम्पत्याचे दोन चिमुकले निराधार झाले आहेत.