लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : लग्नाला १० वर्षे झालेली असताना आणि पदरात दोन मुले असतानाही, एका विवाहित पुरुषाने पत्नीला सोडून महिनाभर आपल्या प्रेयसीच्या घरात मुक्काम ठोकला. इतकेच नव्हे, तर परत आल्यावरही मी कुठे होतो हे विचारणारी तू कोण, असा अजब सवाल करत पत्नीला शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी २७फेब्रुवारी रोजी पती प्रशांत (३९), भासरा जगदीश (४१) आणि सासू (६०, सर्व रा. राजुराबाजार, ता. वरूड) यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.
पीडित महिला आणि आरोपी पती यांचे लग्न १० वर्षापूर्वी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून पतीचे बाहेर अनैतिक प्रेम प्रकरण सुरू होते. यावरून घरात सतत वाद होत असत. पतीचे बाहेर प्रेम प्रकरण असल्यामुळे तो पत्नीला नीट वागणूक देत नव्हता आणि सतत मारहाण करत असे. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पती अचानक घरातून निघून गेला. तो थेट आपल्या प्रेयसीकडे राहायला गेला. पत्नीने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पतीने फोन उचलला नाही. त्यामुळे या घटनेसंदर्भात पिडित पत्नीच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तो घरी परतला, पण सुधारला नाहीच !
तब्बल एक महिन्यानंतर ४ डिसेंबर २०२५ रोजी पती घरी परतला. महिनाभर कुठे होता? अशी विचारणा पत्नीने केली असता, पतीने उलट तिलाच तू मला विचारणारी कोण? असे म्हणून धमकावले. तो मुलांकडेदेखील लक्ष देत नव्हता. आरोपी पतीसोबतच त्याच्या इतर नातेवाइकांनी घर बांधण्यासाठी तू माहेरून एक लाख रुपये आण, नाहीतर इथे राहू नको, असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित पत्नी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. त्यानंतर तिने महिला सेलला तक्रार दिली. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र पती आणि सासरच्या मंडळींच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. अखेर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A husband lived with his girlfriend for a month, neglecting his wife and children. Upon returning, he verbally abused his wife, asking who she was to question him. Police filed a case against the husband and his relatives for domestic violence.
Web Summary : एक पति एक महीने तक अपनी प्रेमिका के साथ लिव-इन में रहा, पत्नी और बच्चों की उपेक्षा की। लौटने पर, उसने अपनी पत्नी को मौखिक रूप से गाली दी, और पूछा कि वह उससे सवाल करने वाली कौन होती है। पुलिस ने पति और उसके रिश्तेदारों के खिलाफ घरेलू हिंसा का मामला दर्ज किया।