पती ‘इर्विन’मध्ये.. मुले गावाकडे..महिलेची फरफट !
By Admin | Updated: October 29, 2014 22:41 IST2014-10-29T22:41:38+5:302014-10-29T22:41:38+5:30
गावात शेजाऱ्यासोबत भांडण झाले..त्याने काठीने हल्ला केला, हाताचे हाड मोडले. त्याची पत्नी त्याला इर्विनला घेऊन आली. शस्त्रक्रिया करावी लागणार, असे निदानही झाले. मात्र, अकरा दिवस उलटूनही अद्याप

पती ‘इर्विन’मध्ये.. मुले गावाकडे..महिलेची फरफट !
वैभव बाबरेकर - अमरावती
गावात शेजाऱ्यासोबत भांडण झाले..त्याने काठीने हल्ला केला, हाताचे हाड मोडले. त्याची पत्नी त्याला इर्विनला घेऊन आली. शस्त्रक्रिया करावी लागणार, असे निदानही झाले. मात्र, अकरा दिवस उलटूनही अद्याप त्याच्या हातावरील शस्त्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही. दोन चिमुरड्यांना गावाकडे सोडून पतीसोबत इर्विनमध्ये आलेली ‘ती’ अक्षरश: घायकुतीस आली आहे. ‘लवकर शस्त्रक्रिया करा अन् गावाकडे जाऊ द्या, लेकरे वाट पाहत आहेत’ अशी आर्जव करण्याची वेळ वंदना सपकाळवर आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये ११ दिवसांपासून पतीवर अद्यापही शस्त्रक्रिया न झाल्याने पत्नीला गावीही जाता येत नाही. घरी दोन चिमुुरडी एकटी असल्याने तिच्या जीवाची नुसती घालमेल चालली आहे. यावरून इर्विन रूग्णालयातील मनमानी कारभार आणि येथील दूरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील वाघापूर येथील रहिवासी शांताराम व्यंकट सपकाळ (४०) असे इर्विन रूग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तिचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी शांताराम सपकाळ यांचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अतुल कराळे याच्याशी भांडण झाले होते. यावेळी अतुलने काठीने शांतारामवर हल्ला केला होता. यामध्ये त्यांचे डाव्या हाताचे हाड मोडले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शांताराम यांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने पत्नीने त्यांना १७ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये दाखल केले.