Husband caught, brother-in-law tortured | पतीने पकडले, भासऱ्याने केला अत्याचार

पतीने पकडले, भासऱ्याने केला अत्याचार

पोलीससूत्रानुसार, राकेश सतरामदास जेठाणी (३७, भासरा), दीपक सतरामदास जेठाणी (३६, पती ) (दोन्ही रा. कृष्णानगर गल्ली क्रमांक ३) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली. ती घरात झोपली असताना, पतीचा मोठा भाऊ घरात शिरला, त्याने शरीर सुखाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे पतीने पकडून ठेवले आणि त्यानंतर त्याच्या भासऱ्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जिवाने मारून टाकेन, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीतून केला आहे. यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३७६(ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूजा खांडेकर करीत आहेत.

Web Title: Husband caught, brother-in-law tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.