बँकांचे व्यवहार आटोपण्याची घाई
By Admin | Updated: March 27, 2015 00:02 IST2015-03-27T00:02:51+5:302015-03-27T00:02:51+5:30
१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आयकर भरणा, जुने व्यवहार आटोपणे, आॅडीट व इतर बँकेची कामे व्यापारी उद्योजक...

बँकांचे व्यवहार आटोपण्याची घाई
अमरावती : १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आयकर भरणा, जुने व्यवहार आटोपणे, आॅडीट व इतर बँकेची कामे व्यापारी उद्योजक आणि संस्थांमध्ये सुरू आहेत. मात्र सलग वेगवेगळ्या कारणांमुळे सुट्या आल्याने २८ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बँकेचे व्यवहार केवळ अडीच दिवस होणार असल्याने बँकेचे मोठे व्यवहार आटोपण्याची घाई सुरू झाली आहे.
अवघ्या पाच दिवस मार्चचा अखेर येऊन ठेपला आहे. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. नव्या आर्थिक वर्षापासून नवनवीन कररचना, नियमावली लागू होणार आहेत. त्यामुळे वर्षभरात केलेले व्यवहार पूर्ण करण्याकडे बहूतांश जणांचा कल असतो. मात्र २८ ते ५ एप्रिल दरम्यान म्हणजेच नऊ दिवसामध्ये केवळ अडीच दिवस राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँका आणि पतसंस्था सुरू राहणार आहेत. त्यामुळे बँक खातेधारकांना पुढील आठवड्याची आर्थिक तरतूद २७ मार्चपूर्वी करणे गरजेचे आहे. ३० ते ३१ मार्चला पूर्णवेळ व चार एप्रिलला अर्धवेळ बँका सुरू राहतील. मात्र या दिवशी बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ व २९ मार्च आणि १ ते ३ एप्रिल रोजी रामनवमी, रविवार, बँक क्लोजिंग, महावीर जयंती, गुडफ्रायडे आणि पुन्हा रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
बँकांच्या ग्राहकांनी मोठे व्यवहार शक्यतो २४ ते २७ मार्च दरम्यान करून घ्यावे लागणार आहे. नऊ पैकी तीन दिवस बँका सुरू असल्या तरी मोठी गर्दी होते. काही बँकांनी कॅश भरणा, पासबुक प्रिंटींगची व्यवस्था संगणकीकृत मशिनद्वारे केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी बँकांनी घेतल्याचे बँकेचे अधिकाऱ्यांने सांगितले. एकंदरीत बँक व्यवहाराचा व्याप एटीएमवर वाढणार आहे. (प्रतिनिधी)