वरूड तालुक्यात चक्रीवादळाचे थैमान

By Admin | Updated: June 12, 2015 01:00 IST2015-06-12T01:00:57+5:302015-06-12T01:00:57+5:30

तालुक्यातील लोणी, मांगरुळी पेठ, काचुर्णा, वाडेगांव, हातुर्णासह काही गावात १० जूनच्या दुपारी साडेतीन वाजता आलेल्या

Hurricane in Worwood taluka | वरूड तालुक्यात चक्रीवादळाचे थैमान

वरूड तालुक्यात चक्रीवादळाचे थैमान

गजानन मोहोड ल्ल अमरावती
पीक पेरणीपासून, पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात पडणारा खंड व अतिपाऊस यापासून शेती पिकाचे नुकसान झाल्यास पिकांना विम्याचे संरक्षण कवच देण्यासाठी, कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना व हवामानावर आधारित पीक विमा योजना या दोन जिल्ह्यांत पथदर्शक स्वरुपात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अधिसूचित मंडळ स्तरावर क्षेत्र घटक धरुन हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सोयाबीन व कपाशीकरिता १४ ही तालुक्यांत मूग पिकांकरिता १२ तालुक्यात व उडीद पिकाकरिता सहा तालुक्यांत ही योजना लागू करण्यात आली आहे. शासनाने विमा हप्त्यात ५० टक्के सवलतीचा लाभ दिला आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० जून ही अंतिम तिथी आहे. सन २०१४-१५ मध्ये या पीक विमा योजनेत ३७ हजार ८८६ शेतकऱ्यांना १५ कोटी २४ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यातील कपाशी सोयाबीन मूग, उडीद, तीळ, तूर, खरीप, भूईमूग व ऊस या पिकांचा समावेश आहे. या योजनेत सर्वसाधारण जोखीम स्तराकरिता कपाशी पिकाला विमा हप्त्यामध्ये अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ७५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. इतर शेतकऱ्यांना ५० टक्के सूट आहे. तसेच इतर पिकांकरिता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. खरीप पीक विमा भरण्याचा अंतिम तारीख ३१ जुलै २०१५ निर्धारित केला आहे. (प्रतिनिधी)

विदर्भ पॅकेज अंतर्गत
विमा हप्ता अनुदान
विदर्भ पॅकेजमधील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या विशेष पॅकेजनुसार सर्वसाधारण जोखीमस्तरावर विशेष अनुदान देण्यात येते. यामध्ये कापूस पिकांसाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पीक विमा हप्ता रक्कमेत ७५ टक्के अनुदान देण्यात येते. इतर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच इतर अधिसूचित पिकांसाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पीकविमा हप्ता रकमेत ५० टक्के अनुदान देण्यात येईल.

राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेचे निकष
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत राज्यातील विमा अधिसूचित क्षेत्रात पूर, चक्रीवादळ, भूस्सखलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला त्यासंबंधित वित्तीय संस्थेस किंवा विमा कंपनीस नुकसान झाल्याच्या ४८ तासांत नुकसानग्रस्त पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीमार्फत महसूल, कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित केले जाईल

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
शेतकऱ्यांना सर्वसाधारण जादा पीक संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या १५० टक्के विमा संरक्षण उपलब्ध आहे.
विविध पिकांचे राजस्व मंडळनिहाय उंबरठा उत्पन्न त्या पिकांचे मागील ३ ते ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न आणि त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठीसुद्धा ही योजना आहे.

Web Title: Hurricane in Worwood taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.