शासकीय धान्य गोदामावरील जुन्या कामगारांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: July 29, 2015 00:23 IST2015-07-29T00:23:23+5:302015-07-29T00:23:23+5:30
शासकीय धान्य गोदाममधील जुन्या कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून घ्या, या मागणीचे निवेदन कामगारांनी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना शनिवारी दिले आहे.

शासकीय धान्य गोदामावरील जुन्या कामगारांवर उपासमारीची पाळी
नांदगाव खंडेश्वर : शासकीय धान्य गोदाममधील जुन्या कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून घ्या, या मागणीचे निवेदन कामगारांनी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना शनिवारी दिले आहे.
यात श्यामराव भोयर, राजेंद्र चौधरी, रमेश खंडाते, दीपक अंबाडरे, प्रदीप चौधरी, रवींद्र चौधरी, शंकर टेकाम, कैलास मरसकोल्हे, राजेंद्र राऊत यांचा समावेश होता.
शासकीय धान्य गोदामात हे कामगार कित्येक वर्षांपासून काम करीत होते. आता त्या ठिकाणी नवीन कामगारांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. कामावर असता त्यांचे चार महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे आर्थिक प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकल्याने त्यांनी काम बंदचा इशारा दिला होता. यावरून त्यांना कामावरून कमी करून नवीन कामगार नियुक्त केल्याने हा प्रश्न जटील झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे अन्यथा उपोषणाचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.