शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोना प्रतिबंधासाठी राबताहेत शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेशाने होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांना आवाहन केले. त्याला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळून लक्षावधी मास्कची निर्मिती करण्यात आली.

ठळक मुद्देमास्कचे सुरक्षाकवच ठेवेल कोरोनापासून दूर : सुरक्षा पोशाख, बेडची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाने जगापुढे नवे संकट उभे केले असताना त्यावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना समाजातील विविध स्तरांतून साथ मिळत आहे. सर्वदूरच्या महिला बचत गट ते कारागृहातील बंदीजन यांचेही योगदान लक्षणीय ठरले. या माध्यमातून दोन लाखांहून अधिक मास्क निर्मिती, विलगीकरण कक्षासाठी खाटा अशा अनेक उपयुक्त साहित्य व वस्तूंची निर्मिती होत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेशाने होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांना आवाहन केले. त्याला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळून लक्षावधी मास्कची निर्मिती करण्यात आली. स्थानिक प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून सुती कापड तयार करण्याचे काम कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून केले जाते. त्यांच्याकडून तयार मास्क दुपदरी सुती कापडाचे मास्क स्वच्छ करून पुन्हा वापररता येतात. स्वयंस्फूतीर्नेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे.बंदीजनांकडून ७५ हजार मास्कजिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या माध्यमातून मास्कनिर्मितीला गती आली आहे. बंदीजनांकडून आतापर्यंत सुमारे ७५ हजार मास्क तयार केले आहेत. कारागृहात अनेक बंदीजन कुशल कारागीर आहेत. रुग्णांसाठी खाटा तयार करण्याची जबाबदारीही बंदीजनांना दिली आहे. कोविड रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथील विलगीकरण कक्ष, मोझरी येथील कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी या खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. दीडशे खाटांची निर्मिती आतापर्यंत झाल्याचे अधीक्षक रमेश कांबळे म्हणाले.१३ महिला बचत गटमहिला भगिणींनी काळाची गरज ओळखून केवळ मास्कनिर्मितीवरच न थांबता सुरक्षा ड्रेसही तयार केले आहेत. दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजिवीका अभियानांतर्गत अमरावतीतील १३ महिला बचतगटांचा समूह अमरावती महापालिकेसाठी मास्क बनविण्याचे काम करीत आहे. बचतगटातील महिला स्वत:च्या घरीच मास्क तयार करण्याचे काम करतात. मास्क बनविण्यासाठी लागणारा कापड खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध करून दिला आहे. जीव धोक्यात घालून काम करणाºया आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार व इतरांना हे मास्क पुरविण्यात येत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या