शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:16 IST

सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या काळात रोज तीन शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याने आता वरवरची मलमपट्टी नव्हे, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. विदर्भात अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा हे सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणा-या शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व त्याच्यावरील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१७ पावेतो १४ हजार ६७७ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ६ हजार ५५९  प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ७ हजार ९९६ अपात्र, तर १२२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदाच्या वर्षात १,१५३ शेतक-यांच्या आत्महत्या  झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारी १०७, मार्च ११२, एप्रिल ८३, मे ९६, जून ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८ व २७ डिसेंबरपर्यंत ६५ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.बुलडाणा आघाडीवर २०१७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या जिल्ह्यात यंदा ३०५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले; अमरावती २६१, यवतमाळ २३७, अकोला १६५, वाशिम ७२ व वर्धा जिल्ह्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली.  कर्जमाफीच्या २०० दिवसांत ६६० शेतकरी आत्महत्याशेतक-यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी शासनाने जून महिन्यात कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यामध्येही शेतकºयांना दिलासा मिळाला नसल्याची बाब आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या २०० दिवसांच्या कालावधीत ६६० शेतकºयांनी मृत्यूचा फास ओढला. यामध्येही खरिपाच्या पेरणीपश्चात आॅगस्ट महिन्यात ११९, तर सप्टेंबर महिन्यात १२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी