ग्राहकांवर शेकडो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड
By Admin | Updated: July 16, 2016 00:07 IST2016-07-16T00:07:43+5:302016-07-16T00:07:43+5:30
जरुड येथे नागरिकांना माहेवारी विद्युत बिले वेळेवर मिळत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

ग्राहकांवर शेकडो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड
जरुड येथे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार : बिले वेळेवर मिळत नसल्याचा आरोप
वरूड : जरुड येथे नागरिकांना माहेवारी विद्युत बिले वेळेवर मिळत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनसुध्दा दखल घेण्यात आली नाही. विद्युत देयके वाटपाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे असल्याने बिले वाटप वेळेवर होत नाही. बिल भरणा करण्याच्या रात्री देयके मिळत असल्याने ग्राहकांची त्रेधा उडत आहे. आधी बिले ग्राहकांना पोहोचण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.
जरुड या गावात वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र असून २ हजार ५०० विद्यत ग्राहक आहे. वेळेवरच वीज देयके ग्राहकांना प्राप्त होत असल्याने विहीत मुदतीत निव्वळ बिलाचा भरणा करता येत नसल्याने प्रतिबिल ५० रुपये अधिक बिलाचा भरणा करावा लागत असल्याने गावातून एक लक्ष २५ हजार रुपये अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. वीज देयके केवळ कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे ेउशिरा प्राप्त होत असल्याने ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड भरावा लागतो. याबाबत नागरिकांनी कनिष्ठ अभियंता शेगावकर यांना विचारणा केली असता आमचा विद्युत देयके वाटपाशी कुठलाही संबंध नसल्याचे ेसांगत जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला. यामुळे संतप्त ग्राहकांनी वीज वितरण कंपनीने एक महिन्याच्या आत बिले वाटपात सुरळीतपणा आणली नाही तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोण्याचा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना रोशन दारोकर, अंकुश राऊत, सुशांत शिरभाते, रोशन तिनखेडे, अमोल यावले, जितेंद्र पोकळे, मनोज वानखडे, विजय वानखडे, धीरज राऊत, सुमित हरले, ऋषिकेश राजस, नीलेश लाड, सूरज दाढे, सिराज शेख, कपिल नागले, मोहन बंदे, आशिष केवटे, श्रीकांत कानडे सह आदी नागरीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)