अंबा नाल्यात शेकडो टन प्लास्टिक
By Admin | Updated: December 9, 2015 00:15 IST2015-12-09T00:15:25+5:302015-12-09T00:15:25+5:30
शहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते.

अंबा नाल्यात शेकडो टन प्लास्टिक
महापालिकेचे दुर्लक्ष : कचरा, प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा
वैभव बाबरेकर अमरावती
शहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते. दररोज शहरातील २५० टन कचरा कंपोस्ट डेपोत टाकण्यात येत असतानाही नाल्यामध्ये शेकडो टन प्लास्टिक गोळा झाला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अंबानगरीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान सुरु केले आहे. मात्र, अमरावती महानगर पालिकेचे स्वच्छतेकडे विशेष लक्ष नाही. शहरातील चारही झोनमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. मात्र, बहुतांश परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे शहरच कचरामय झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत उदासीनता निर्माण होत आहे. काही परिसरात कचराकुंडी आहेत, तर काहींमध्ये अद्यापही नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. योग्य प्रकारे उचल्या जात नसल्यामुळे अर्धाअधिक कचरा कन्टेंनरमध्ये पडून राहत आहे काही परिसरात कचरा कुंडीतच कचऱ्यांचे ढिगारे जमले आहे. एकीकडे सुळकी येथील कम्पोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यातच अमरावतीतून निघणारा कचरा कंपोेस्ट डेपोमध्ये नेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळींनी कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजनासंदर्भात आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने अपूर्णच आहेत.
आश्वासने हवेत विरली
अमरावती : अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळीने कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासने दिले आहेत. मात्र, अद्याप कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने पूर्ण झालीच नाहीत.
या कचऱ्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक असल्यामुळे ती हवेमार्फत विविध ठिकाणी पसरतानाही दिसून येत आहे. लाखो घरातून निघणारा हजारो टन कचरापैकी काही कचरा हा कम्पोस्ट डेपोत टाकण्यात येत असून काही कचरा हा शहरातील नाल्यामध्ये गोळा होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातून गेलेल्या नाल्यामध्ये हजारो टन कचरा तसाच पडून आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर वर्षभर नाल्यात कचरा गोळा झाल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.