ह्युमन डेव्हलपमेंट अभ्यासक्रम, बुद्धिझम, पाली भाषा विभाग होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:48+5:302021-01-19T04:15:48+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान पदव्युत्तर विभागात एम.एस्सी. ह्युमन डेव्हलपमेंट अभ्यासक्रम तर, बुद्धिझम व पाली भाषा विभाग ...

ह्युमन डेव्हलपमेंट अभ्यासक्रम, बुद्धिझम, पाली भाषा विभाग होणार सुरू
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान पदव्युत्तर विभागात एम.एस्सी. ह्युमन डेव्हलपमेंट अभ्यासक्रम तर, बुद्धिझम व पाली भाषा विभाग सुरू करण्याचा निर्णय विद्या परिषदेने ४ डिसेंबर २०२० रोजीच्या बैठकीत घेतला आहे. मात्र, या विषयांवर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतरच शिक्कामोर्तब होईल,
असे चित्र आहे.
अधिष्ठाता मंडळाने पदव्युत्तर ह्युमन डेव्हलपमेंट, बुद्धिझम, पाली भाषा विभाग सुरू करण्यासाठी शिफारस केली होती. या विषयांवर विद्या परिषदेच्या सदस्यांनी चर्चा करून अधिष्ठाता मंडळाच्या शिफारशी मंजूर केल्यात. मात्र, व्यवस्थापन परिषदेकडे निर्णय सोपविण्यात आला आहे. पदव्युत्तर बुद्धिझम, पाली भाषा विभाग सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी यानिमित्ताने मंजूर होत आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयांना मान्यता मिळताच येत्या शैक्षणिक सत्रापासून हे अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे दिसून येत आहे.