उद्घाटनालाच हुक्का पार्लरचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 22:35 IST2017-09-05T22:34:44+5:302017-09-05T22:35:04+5:30

उदघाटनाच्या दिवशीच जयस्तंभ चौकातील प्रिया थिएटरच्या बाजूला असलेल्या हॉटेल रजवाडातील हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला.

Hukka parlor exposed in inauguration | उद्घाटनालाच हुक्का पार्लरचा पर्दाफाश

उद्घाटनालाच हुक्का पार्लरचा पर्दाफाश

ठळक मुद्देहॉटेल रजवाडा येथील प्रकार : मालकासह सहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उदघाटनाच्या दिवशीच जयस्तंभ चौकातील प्रिया थिएटरच्या बाजूला असलेल्या हॉटेल रजवाडातील हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला. कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह सहा जणांना अटक केली. घटनास्थळावरून हुक्क्याचे साहित्य व विविध फ्लेवर असा एकूण ६४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार हॉटेल रजवाडा हे निकेश हरीशकुमार प्रधान (रा.नवी वस्ती, बडनेरा) यांनी नुकतेच चालविण्यासाठी घेतले होते. सकाळी हुक्का पार्लरचे थाटात उद्घाटन झाले. येथे ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती. मात्र, शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला आहे. असे असूनही नव्याने हुक्का पार्लर सुरु करण्याचे धाडस संचालकाने दाखविले. याबाबत गुप्त माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय कदम, पीएसआय राजमल, अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, विनोद भगत, सागर ठाकरे, सचि शेळके व गांवडे यांनी हॉटेल रजवाडावर धाड टाकली. त्याठिकाणी पाच युवक हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेल मालक निकेश हरिशकुमार प्रधान व योगेश सुरेश चुलपार (रा.खापर्डे बगिचा) व मंथन विशाल निंबोरकर (रा.पारीजात कॉलनी), अंकुश महादेव घामाडे (रा.डाबकी रोड, अकोला), रामेश्वर विश्वनाथ तारापुर, सौरभ देवराव वानखडे (रा.वैभव कॉलनी) अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी रजवाडा हॉटेलमधून हुक्का पार्लरचे साहित्य, विविध प्रकारचे तंबाखू फ्लेवर असा एकूण ६४ हजारांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Hukka parlor exposed in inauguration