लॉकडाऊनचा धास्तीने बाजारात प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:35+5:302021-02-24T04:13:35+5:30
फोटो पी २२ चांदूर बाजार चांदूर बाजार : अमरावती व अचलपूर शहरांपाठोपाठ आपल्या शहरात, तालुक्यात लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी ...

लॉकडाऊनचा धास्तीने बाजारात प्रचंड गर्दी
फोटो पी २२ चांदूर बाजार
चांदूर बाजार : अमरावती व अचलपूर शहरांपाठोपाठ आपल्या शहरात, तालुक्यात लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी सोमवारी अनेक नागरिक खरेदीकरिता उतरल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली, तर पेट्रोल पंप, बँक व भाजी मंडईत प्रचंड गर्दी झाली.
शहर तथा तालुक्यातील सर्वाधिक गर्दी किराणा, धान्य दुकानांत तसेच भाजीपाला दुकानांवर झाली. त्यातही खेड्यापाड्यातील नागरिकसुद्धा सिलिंडर, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शहरात दाखल झाले. एकीकडे कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असताना, नागरिकांनी केलेली गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत आहे. चांदूर बाजार शहरात आठवडी बाजारातील भाजीपाला तसेच फळ विक्रेते, दुकानदार मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. शहरातील अनेक मार्गांवर सोमवारी वाहतूककोंडी झाली होती.
कोट
नागरिकांनी गर्दी करू नये. चांदूर शहर व तालुक्यात लॉकडाऊन लागलेला नाही. व्यावसायिकांनी विनामास्क ग्राहकांना सेवा देऊ नये. व्यावसायिक मास्क न लावता व्यवसाय करीत असतील, तर त्यांची तक्रार नागरिक करू शकतात. यावर स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करेल.
- धीरज स्थूल, तहसीलदार, चांदूर बाजार
-------