शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणार कशी? शेतकऱ्यांची ऑनलाईन नांदणी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:25 IST

१२ जानेवारी 'डेडलाइन' : दोन महिन्यांत आठ हजार शेतकऱ्यांची झाली खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सोयाबीनच्या ऑनलाइन नोंदणीची मुदत ६ जानेवारीला संपली, अद्याप शेकडो शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. शिवाय खरेदीची १२ जानेवारी डेडलाइन असताना ११ हजार शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे. चार दिवसांत एवढ्या सोयाबीनची यंत्रणांद्वारा खरेदी करणे २० केंद्रांवर शक्य नाही. त्यामुळे सोयाबीनच्या नोंदणी व खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

नाफेडमध्ये सोयाबीनची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यासाठी ३१ डिसेंबर डेडलाइन होती. यानंतर ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तीदेखील मंगळवारी संपली आहे. प्रत्यक्षात ओटीपीच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे प्रत्येक केंद्रावर शेकडो शेतकरी वंचित राहिले आहे.

अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विकावे लागले आहे तर काहींनी दरवाढ होण्याच्या अपेक्षेत सोयाबीनची साठवणूक करीत आहे. साईटच्या अडचणी असल्यामुळे अनेक केंद्रांवर अर्ज ऑनलाइन करायचे राहिले आहे. त्यामुळे काही साईट ओपन केल्यास त्या प्रलंबित अर्जाची नोंदणी करता येणार असल्याबाबतची शेतकऱ्यांची मागणी आहे.

२० केंद्रांवर सोयाबीन खरेदीची संथगती : शेतकऱ्यांचा आरोप 

  • नाफेडची २० केंद्रांवर शासन दराने सोयाबीनची खरेदी होत आहे. यासाठी व्हीसीएमएफ व डीएमओच्या केंद्रांवर १९,२१२ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. तुलनेत ८२८० शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. 
  • खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन आहे. या अवधीत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे शक्य नसल्याने खरेदीलाही मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ऑक्टोबरच्या अखेरीस चार ते पाच व २१ नोव्हेंबरनंतर १५ अशा एकूण २० केंद्रांवर आतापर्यंत नोंदणी झालेल्या १९ हजार शेतकऱ्यांपैकी आठ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे व अशा परिस्थितीत १२ जानेवारीला खरेदी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पाच दिवसांत ११ हजार शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी होणे शक्य नाही. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ आवश्यक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीSoybeanसोयाबीनFarmerशेतकरी