शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत? तलाठ्यांच्या याद्या 'कृषी'ला अप्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:06 IST

भावांतर योजना : कपाशी, सोयाबीनचे अनुदान केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनसाठी दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे या यादीत नसल्याने त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी ज्यांच्या सात-बाऱ्यावर या पिकांची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाठीवर्गाकडून मागविण्यात आल्या. प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्यापासून या याद्या तलाठी वर्गाकडून कृषी विभागाला अप्राप्त असल्याने शासनाला प्रस्ताव गेला नसल्याचे वास्तव आहे.

गतवर्षी पावसाअभावी कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले व हमीभावही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही निघालेला नाही. त्यामुळे या खातेदारांना दोन हेक्टर मर्यादेत प्रतिहेक्टरी पाच हजारांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये ज्या खातेदारांनी ई पीक पाहणी केली असेल त्यांनाच मदत देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले व त्याच शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पेऱ्यानुसार शासन मदत मिळण्याची शक्यता आहे. 

वनपट्टेधारकांची यादी जिल्हाधिकारी देणार आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित आहे. अशा वनपट्टेधारकांपैकी कपाशी किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती. याची गावनिहाय यादी संकलित करण्यात येऊन जिल्हा स्तरावरून ही यादी कृषी विभागाला देण्यात येणार आहे व याची पोर्टलवर माहिती कृषी विभागाद्वारा अपलोड करण्यात येणार असली तरी माहिती अद्याप अप्राप्त आहे.

तलाठ्यांच्या याद्या कृषी विभागाला अप्राप्त ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली व त्यांची नावे यादीत नाहीत. मात्र, त्यांच्या सात-बारावर पिकांची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना याबाबत स्थानिक तलाठी यांच्याकडे नोंद करावी लागेल व त्यानंतर पडताळणी करून संबंधित तलाठी यांच्याद्वारा याद्या कृषी विभागाला देण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात अशा याद्या कृषी विभागाकडे अप्राप्त आहेत.

योजनेची जिल्हा स्थिती ई-केवायसी झालेले शेतकरी  - २,१७,८१५             कपाशीचा पेरा असलेले शेतकरी - १,०६,३०२ सोयाबीनचा पेरा शेतकरी - १,४८,४७७

"यादीत नाव असलेल्या व ई-केवायसीची प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळाला. सात-बाऱ्यावर नोंद व ई-पीक पाहणीमध्ये नोंद नाही. अशा शेतकऱ्यांच्या याद्या अप्राप्त आहेत." - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती