शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

जिल्ह्यात सुरक्षितता कितपत ? वर्षभरात बलात्कार विनयभंगाचे ३८३ एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:09 IST

शाळकरी मुली लक्ष्य : वर्षभरातील अपहरण, अत्याचार उघडकीस

प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहर असो वा जिल्ह्याचा ग्रामीण भाग, अल्पवयीन मुली तथा कॉलेजवयीन मुलींचा पाठलाग, विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहर वा जिल्ह्यात मुली, महिला किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न समाजाला भेडसावू लागला आहे. कौटुंबिक कलहदेखील पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. सोबतच काही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यासह त्यांच्यावर अकाली मातृत्व लादल्याच्या घटनादेखील उघड झाल्या आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर कॉलेजवयीन मुलींच्या पाठलागास, विनयभंगास, बलात्कारास कारणीभूत ठरत आहे.

चार महिन्यांपूर्वी शिरखेड व तिवसा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नांमुळे शाळकरी मुली नराधमांचे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पहिल्या ११ महिन्यांत बलात्कारातून १५ पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर अकाली गर्भारपण लादण्यात आले. सोशल मीडियातून झालेली ओळख, त्यातून त्या अनोळखी व्यक्तीप्रति निर्माण झालेले आकर्षण तसेच लग्नाच्या आमिषापोटी अनेक मुलींना शारीरिक अत्याचाराला, अपहरणाला सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास गेल्या दीड वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेसबूकवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पद्धतीने तरुणींना त्रास दिल्याबाबतचे अर्ज सायबर सेलकडे येत आहेत. या अर्जाचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यांमधील आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचे किंवा जवळचे असल्याचे दिसून येते.

बलात्कार, विनयभंगाचे ३८३ गुन्हे ग्रामीण जिल्ह्यात यंदाच्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिलांवरील अत्याचार व विनयभंग असे एकूण ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले. सर्व गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. यंदा अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे एकूण २०२ गुन्हे नोंदविण्यात आले. पैकी १७४ मुला-मुलींचा शोध घेण्यात आला आहे. यंदाच्या ११ महिन्यांत बलात्काराचे ११७, तर विनयभंगाचे २६६ गुन्हे नोंदविण्यात आले.

गतवर्षीच्या ११ महिन्यांत अशी झाली गुन्ह्यांची नोंद सन २०२३ च्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिला अत्याचाराचे १०४, तर विनयभंगाबाबत २८१ एफआयआर नोंदविले. विनयभंगाची एक घटना वगळता ३८४ एफआयआरमधील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

"विनयभंग, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथके, महिला पथकेदेखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. धरण व निर्जनस्थळी गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. असे गुन्हे तातडीने दाखल करून तपास केला जातो." - किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी