विद्यार्थांचे मूल्यमापन कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:21+5:302021-03-19T04:12:21+5:30
भातकुली : दरवर्षी मार्च महिन्यात पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन सुरू होते. मात्र, यंदाचे शैक्षणिक ...

विद्यार्थांचे मूल्यमापन कसे?
भातकुली : दरवर्षी मार्च महिन्यात पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन सुरू होते. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप मूल्यमापन योजनेविषयी निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शाळा शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या? याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ष प्रत्यक्ष भरलेच नाहीत. तसेच २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यामध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ५० टक्केच होती. शाळेत विद्यार्थी संख्या वाढायला सुरुवात झालीच होती, की, कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायला वेळ मिळाला नाही. काही शाळांत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय दिले. त्यांची तपासणी सुद्धा केली आहे. त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित करण्याचे प्रशासनाने आदेशित करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी केली आहे.