काळा कोट घालून बारमध्ये कसे आले? वकिलाला प्रश्न विचारून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:18+5:302021-02-05T05:27:18+5:30

अमरावती : काळा कोट घालून रेस्टाॅरंट ॲन्ड बारमध्ये जेवण करण्यास गेलेल्या नागपूर येथील एका वकिलाला बारमध्ये पूर्वीच बसलेल्या दोन ...

How did you get into the bar wearing a black coat? Beating the lawyer by asking questions | काळा कोट घालून बारमध्ये कसे आले? वकिलाला प्रश्न विचारून मारहाण

काळा कोट घालून बारमध्ये कसे आले? वकिलाला प्रश्न विचारून मारहाण

अमरावती : काळा कोट घालून रेस्टाॅरंट ॲन्ड बारमध्ये जेवण करण्यास गेलेल्या नागपूर येथील एका वकिलाला बारमध्ये पूर्वीच बसलेल्या दोन इसमांनी मारहाण केल्याची घटना बियाणी चौकात बुधवारी दुपारी घडली. तक्रारीवरून पंकज तट्टे व एका अज्ञात इसमाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

फिर्यादी व जखमी राहुल देवराव गुल्हाने (५१, रा. रतननगर रिंगरोड नागपूर) हे नागपूर उच्च न्यायालयात वकील असल्याची माहिती आहे. ते बियाणी मार्गावरील एका बारमध्ये जेवण करायला गेले असता, आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. तुम्ही कोट घालून कसे काय बारमध्ये आले, अशी विचारणा केली. त्यावर मी कोट काढून जेवण करणार आहे, असे फिर्यादीने सांगितले. पुन्हा आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. तेथील लोखंडी खुर्ची उचलून वकिलाच्या डोक्यावर मारली. त्यात ते जखमी झाले. गुल्हाने यांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२४,५०६,३४ अन्वये गुन्हे नोंदविले.

कोट

नागपूर येथील फिर्यादी वकिलांची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून गुन्हा नोंदविला. बारमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येईल. मारहाण करणारेसुद्धा वकिली पेशाशी निगडित असल्याची माहिती फिर्यादीने दिली.

- पुंडलिक मेश्राम, ठाणेदार फ्रेजरपुरा

Web Title: How did you get into the bar wearing a black coat? Beating the lawyer by asking questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.