ग्रामीण भागात घरोघरी होणार नाळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:56+5:302021-07-27T04:13:56+5:30
अमरावती : जल जीवन मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामीण भागांतील सर्वांना नळजोडणीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘हर ...

ग्रामीण भागात घरोघरी होणार नाळजोडणी
अमरावती : जल जीवन मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामीण भागांतील सर्वांना नळजोडणीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘हर घर नल से जल’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. २३ जुलैपासून सुरू झालेला हा उपक्रम ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांचे गाव कृती आराखडा कालबद्ध व अचूक पद्धतीने बनवून घेणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. याखेरीज गाव कृती आराखडा निर्मितीकरिता कोबो कलेक्ट आधारित साधनांचा वापर करण्यासाठी जिल्हास्तरावरील मनुष्यबळाची क्षमता बांधणी, जिल्हा व तालुकास्तरावरील तज्ञ प्रशिक्षकांची क्षमता बांधणी, गावपातळीवर संकलित झालेली माहिती व आकडेवारी डिजिटल माध्यमातून भरून गाव कृती आराखडा व पर्यायी जिल्हा कृती आराखडा तयार केला जाईल. यावेळी राज्य पाणी व स्वच्छता विभाग तसेच युनिसेफच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हास्तरावरील सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यांना आभासी पद्धतीने गाव कृती आराखडा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याप्रमाणे राज्य शासनातर्फे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांसाठीसुद्धा आभासी पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे. पुढे हेच प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर अंगणवाडी सेविका, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन सदस्यांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देतील. यानंतर १ ते ३ ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडे करता लागणारी आवश्यक माहिती गोळा करून त्या माहितीच्या आधारे आराखडे पूर्ण केले जातील. या आराखड्याची तालुकास्तरावर ५ ते ७ ऑगस्टला पडताळणी करून आवश्यक सुधारणेस १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आराखडा वाचन करून मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.