बेलोऱ्यात दोन घरांची राखरांगोळी
By Admin | Updated: April 26, 2016 23:59 IST2016-04-26T23:59:14+5:302016-04-26T23:59:14+5:30
घराजवळील कुटार पेटल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

बेलोऱ्यात दोन घरांची राखरांगोळी
दर्यापूर तालुक्यातील घटना : चार लाखांचे नुकसान
दर्यापूर : घराजवळील कुटार पेटल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यात दोन घरांची राखरांगोळी झाल्याने घरमालकाचे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी दर्यापूर येथील अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही घटना दर्यापूर तालुक्यातील बेलोरा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक कुटाराने पेट घेतला. हळूहळू ही आग शंकर पंजाबराव भारसाकळे व रंगराव रामचंद्र भारसाकळे यांच्या घरापर्यंत पोहोचली. आगीत दोघांच्याही घरांची राखरांगोळी झाली. गोपाल देवीदास भारसाकळे यांच्या कापसाच्या गंजीला आग लागली. या भीषण आगीत दोन बकऱ्या दगावल्या. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दादाराव भारसाकळे यांच्या घराचा दरवाजा जळाला असून नागरिकांच्या समयसूचकतेमुळे ही आग आटोक्यात आली. माहिती मिळताच तहसीलदार राहुल तायडे, राहुल चव्हाण, तलाठी वानखडे, अनिल भारसाकळे, सुनील भारसाकळे, अनिल भारसाकळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)