घराघरांत झाडू, सूप अन् तिजोरीचे पूजन

By Admin | Updated: October 20, 2014 23:04 IST2014-10-20T23:04:34+5:302014-10-20T23:04:34+5:30

यक्षाय कुबेराय वैैश्रवणाय धनधान्य अधिपतेय, धनधान्य समृध्दी ये देही दापय स्व: मंगळवारी धनत्रयोदशी. या दिवशी उपरोक्त मंत्राने भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याची परंपरा आहे.

House-sweep broom, soup and vault of the safari | घराघरांत झाडू, सूप अन् तिजोरीचे पूजन

घराघरांत झाडू, सूप अन् तिजोरीचे पूजन

सुरेश सवळे - चांदूरबाजार
यक्षाय कुबेराय वैैश्रवणाय
धनधान्य अधिपतेय, धनधान्य समृध्दी ये देही दापय स्व:
मंगळवारी धनत्रयोदशी. या दिवशी उपरोक्त मंत्राने भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याची परंपरा आहे. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत दिले आणि अमर केले. त्यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुरारोग्य लाभण्यासाठी घराघरांत नवीन झाडू, सूप व तिजोरीत कुबेराची पूजा करण्याची परंपरा आहे.
दिवाळी हा मांगल्याचा सण. वसू बारसेचा दुसरा म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी सायंकाळी दीप प्रज्ज्वलन करून घर आणि दुकानांची पूजा केली जाते. मंदिर, गोशाळा, घाट, विहिरी, तलाव आणि बागेत दिवा लावला जातो. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणांच्या खरेदीला अनेक जण प्राधान्य देतात. कार्तिक स्नान करून मंदिरात तीन दिवस दिवे लावले जातात. कुबेराची पूजा करताना व्यवसायाच्या ठिकाणी शुभमुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी स्वच्छ करून त्यावर नवीन कापड अंथरले जाते. सायंकाळी तेरा दिवे लावून कुबेराची पूजा करण्यात येते. धनत्रयोदशीच्या सायंकाळी पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावण्यात येतो.

Web Title: House-sweep broom, soup and vault of the safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.