फॉरेस्ट कॉलनीत घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:05+5:302021-05-12T04:14:05+5:30

वेल्डिंग वर्कशॉप सुरू ठेवल्याबद्दल कारवाई अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी कठोर संचारबंदीचे आदेश असताना वेल्डिंग वर्कशॉप उघडे ठेवल्याबद्दल संतोष रामराव ...

The house in Forest Colony was broken into | फॉरेस्ट कॉलनीत घर फोडले

फॉरेस्ट कॉलनीत घर फोडले

वेल्डिंग वर्कशॉप सुरू ठेवल्याबद्दल कारवाई

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी कठोर संचारबंदीचे आदेश असताना वेल्डिंग वर्कशॉप उघडे ठेवल्याबद्दल संतोष रामराव बाभूळकर (रा. ब्रम्हचारीनगर, वलगाव रोड) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, २६९, २७०, २७१ सह कलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम सह कलम ५१ (ब) अन्वये सोमवारी गुन्हा नोंदविला. समजपत्रावर त्यांना सोडण्यात आले.

--------------

कृष्णानगरात घरापुढून पळविली दुचाकी

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर येथील सुमीत हरेशकुमार सारानी (२४) या युवकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने घरापुढून पळवून नेली. एमएच २७ सीजी ८०१७ क्रमांकाची ही दुचाकी त्याने १० मे रोजी सकाळी ११ वाजता घरापुढे लावली. १२ वाजता ती जागेवर नव्हती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-----------------------

Web Title: The house in Forest Colony was broken into