शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चिखलदऱ्यात घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:01 IST

बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पंचनामा करून सदर अहवाल तलाठ्यांनी तहसीलदार माया माने यांना पाठविला.

ठळक मुद्देजिवंत वीज तारा तुटल्या : झाड उन्मळून पडले, नदी-नाले खळखळू लागले

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील एका आदिवासीचे घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. गुरुवारी सकाळी चिखलदरा शहरातील जिवंत वीत तारांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पंचनामा करून सदर अहवाल तलाठ्यांनी तहसीलदार माया माने यांना पाठविला. तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चिखलदरा मंडळ ३५.४ मिमी, सेमडोह ३४.४ मिमी, चुरणी २२.४ मिमी, टेब्रुसोंडा.२४.२४ मिमी, असा सरासरी २९.१५ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात एकूण पाऊस ३४.१५ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे.चिखलदरा तालुक्यात बुधवारपासून सुरू झालेल्या या मान्यूनपूर्व पावसामुळे परिसरातील सिपना, चंद्रभागा, खुर्शी नद्यांसह नाल्यांना थोड्याफार प्रमाणात पाणी आल्याने मागील दोन महिन्यांपासून मृत पडलेले नदी-नाले खळखळू लागले आहेत.चिखलदरा, काटकुंभ परिसर अंधारातचगुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्याने चिखलदरा शहरातील मुख्य मार्गावरील विद्युत तारांवर पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर झाड उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटल्या. यात शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यात तीन विद्युत पोल वाकले, तर तालुक्यातील काटकुंभ, चुरणी परिसरातील ४२ गावांमध्ये मागील तीन दिवसांपासून वीपुरवठा खंडित आहे. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी तांत्रिक बिघाड शोधण्यास फिरत असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत परिसराचा विद्युतपुरवठा खंडित होता.

टॅग्स :Rainपाऊस