शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मात्र, हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांचा रोजगार बुडाला आहे. किंबहुना हॉटेलमधील शिल्लक राहणाऱ्या पोळी-भाकरीने अनेकांच्या पोटाची भूक भागत होती ती देखील हिरावली आहे.

अमरावती शहरात १२५ पेक्षा अधिक हॉटेलची संख्या आहे. एका हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी किमान दोन ते तीन महिला काम करतात. हॉटेलबंदीमुळे ३०० ते ४०० महिलांचा रोजगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनविण्याच्या कामावर गेल्याशिवाय कुटुंबाचा गाडा चालवू शकत नाही, अशा १५० महिलांवर आजारी पतीसह मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात काही महिला घरूनच पोळी-भाकरी, मांडे बनवून हॉटेलमध्ये पुरवितात. गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. कसेबसे नवीन वर्षात हॉटेल सुरू झाले असताना आता पुन्हा ३० ए्प्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले. गरीब, सामान्य कुटुंबीयांनी रोजगार कसा मिळवावा, हा यक्षप्रश्न कष्टकरी महिलांनी उपस्थित केला आहे.

-----------------

शहरात हॉटेल्सची संख्या : १२५

पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची साधारण संख्या : ३५०

--------------

कोट

घरात पती आजारी आहे. मुलगी लग्नाला आली आहे. आज, उद्या कधीतरी हॉटेल नियमित सुरू होतील आणि एकदाचा कायम रोजगार मिळेल, याची प्रतीक्षा आहे. मात्र, कोरोनाने जगणे हिरावले आहे.

- सिंधू वानखडे, अमरावती

---------

कोट

दारूच्या व्यसनाने तीन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. एक मुलगी, एक मुलगा असा सांभाळ करावा लागत आहे. घरी वृद्ध सासू असून, त्यांचे आजारपणाची जबाबदारी आहे. हॉटेलमध्ये भाजी-पोळी बनविण्यातून रोजगार तर मिळतो. पण उरलेल्या पोळी-भाकरीतून कुटुंबांची भूक भागविते

शैला मनवर, बडनेरा

---------------

कोट

दिवसा घर सांभाळून सायंकाळी ५ वाजतानंतर हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी रोजगार मिळतो. मात्र, गत वर्षभरापासून रोजगार हिरावला आहे. महिलांना बाहेरील कामे करताना अनंत अडचणी येतात. हॉटेलमध्ये ठरावीक वेळेत कामे असल्याने ते सोयीचे ठरते. आता रोजगार नसल्याने कुटुंबात आर्थिक परवड होत आहे.

- पुष्पा मेश्राम, अमरावती.

-----------

सांगा! गरीबांनी जगावे नाही का?

कामावर गेल्याशिवाय चुल पेटत नाही. किमान हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याच्या कामातून दिवसाला २५० ते ३०० रूपये रोजगार मिळतो. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून हॉटेल व्यवसायाला अवकळा आली आहे. हॉटेलमधील कूक, वेटर, हेल्पर यासह महिलांचा रोजगार हिरावला आहे. गरीब, श्रमजीवी महिलांसमोर कुटुंबाचा सांभाळ करताना मुलांचे शिक्षण, आरोग्याची दक्षता घ्यावी लागते. ‘काम नाही तर मजुरी नाही’ असा हॉटेल व्यवसायाचे

नियम आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये गरीबांनी जगावे नाही का? असा सवाल हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांनी उपस्थित केला आहे.