हॉट सन्डे

By Admin | Updated: April 20, 2015 00:30 IST2015-04-20T00:30:19+5:302015-04-20T00:30:19+5:30

अवकाळी पावसामुळे यंदा उन्हाचा प्रभाव उशिरा जाणवला. मात्र, दोन दिवसांत तीव्र झळा जाणवू लागल्या आहे.

Hot Sunday | हॉट सन्डे

हॉट सन्डे

पारा ४३ डिग्री सेल्सिअस : तीव्र झळा, वर्दळ ओसरली
वैभव बाबरेकर अमरावती
अवकाळी पावसामुळे यंदा उन्हाचा प्रभाव उशिरा जाणवला. मात्र, दोन दिवसांत तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. रविवार तर अमरावतीकरांनी ‘हॉट सन्डे’ अनुभवला. रविवारी पारा ४३ डीग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. जलविज्ञान प्रकल्प विभागाने याची नोंद केली आहे.
फेब्रुवारीपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस एप्रिलच्या मध्यापर्यंत कायम होता. त्यामुळे तसा उन्हाळा जाणवलाच नाही. परंतु आता मात्र ऊन कडाडू लागले आहे. मे महिन्यात पाऱ्याने ४५ चा आकडा गाठल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

ढगाळ वातावरणामुळे तापमान अद्याप कमीच आहे. ढगाळ वातावरण निवळताच उन्हाची तीव्रता जाणवू लागले.
-अनिल बंड,
हवामान तज्ज्ञ,

Web Title: Hot Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.