हॉट स्पॉट वाॅर्ड, मोहल्ल्यावर आरोग्य यंत्रणेचा ‘वॉच‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:27+5:302021-02-14T04:13:27+5:30

अमरावती : शहरापाठोपाठ जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या गतीने वाढत आहे. हा चिंतेचा विषय ठरला आहे. शहरातील ...

Hot spot ward, ‘watch’ of health system in the neighborhood | हॉट स्पॉट वाॅर्ड, मोहल्ल्यावर आरोग्य यंत्रणेचा ‘वॉच‘

हॉट स्पॉट वाॅर्ड, मोहल्ल्यावर आरोग्य यंत्रणेचा ‘वॉच‘

अमरावती : शहरापाठोपाठ जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या गतीने वाढत आहे. हा चिंतेचा विषय ठरला आहे. शहरातील आठ ते नऊ भागांत काही दिवसांपासून रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. अशा परिसरांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. या भागात नागरिकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे.

शहरातील राजापेठ, रुक्मिणीनगर, दस्तुरनगर, साईनगर, कठोरा नाका रोड तसेच ग्रामीण भागातील अचलपूर, मोर्शी, चांदूर बाजार, तिवसा या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये कोरोना संक्रमित वाढत असल्याचे काही दिवसांतील रुग्णसंख्येवरून आढळून आले आहे. त्यामुळे अशा वाॅर्ड, मोहल्ल्यात असलेल्या परिरसरांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत. ज्या भागात रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे, असा भाग हायरिस्क म्हणून ओळखले जात आहे. याशिवाय या भागातील होम आयसोलेशनमधील रुग्णांवर आरोग्य यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगासुद्धा उगारला जाणार आहे. एकंदरीत हॉट स्पॉट असलेल्या तालुक्यातील वाॅर्ड, मोहल्ला अशा परिसरावर आरोग्य यंत्रणेने आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

कोट

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण शोधून त्यांची गावे कोणती, वास्तव्यास असलेल्या वाॅर्ड व मोहल्ल्यातील संबंधित रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तीच्या ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत.

- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Hot spot ward, ‘watch’ of health system in the neighborhood