वसतिगृह अधीक्षक मौजे याला अखेर अटक

By Admin | Updated: August 26, 2016 23:53 IST2016-08-26T23:53:36+5:302016-08-26T23:53:36+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रम ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींच्या ....

Hostel superintendent Moyej finally arrested | वसतिगृह अधीक्षक मौजे याला अखेर अटक

वसतिगृह अधीक्षक मौजे याला अखेर अटक

अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रम ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहाचा अधीक्षक दिलीप गोविंद मौजे (४५) याच्या मुसक्या पोलिसांनी अखेर आवळल्याच. बाल न्याय (मुलांचे संरक्षण व काळजी) काद्यान्वये मौजे याला अटक करण्यात आली.
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलांची सर्वंकष जबाबदारी अधीक्षक यांचीच आहे. अधीक्षक मौजे याच्या अखत्यारित मुले असताना सुरेंद्र मराठे याने ३० जुलैच्या रात्री दीडच्या सुमारास अजय वणवे या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याचा चेहरा आणि डोके वसतिगृहातच दगडाने ठेचले. ७ जुलै रोजी प्रथमेश सगणे या पाचवीतील विद्यार्थ्याचा गळा सुरेंद्रने ब्लेडने कापला. या घटना अर्थात्च अधीक्षकाने कर्तव्य काटेकारपणे न बजावल्यामुळे घडल्या. सुरेंद्र मराठे याला गुन्हा करण्यास मौजे याने एक प्रकारे मोकळीकच दिली. गुन्ह्याचा हा ठपका ठेवून मौजे याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मौजे याच्याकडून काही खास हाती लागते की कसे, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Hostel superintendent Moyej finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.