१ हजार ११० हेक्टरमध्येच फळबाग लागवड

By Admin | Updated: March 22, 2015 01:28 IST2015-03-22T01:28:27+5:302015-03-22T01:28:27+5:30

रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विभागात एक हजार ११० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड केली आहे.

Horticulture is planted in 1,000 hectares | १ हजार ११० हेक्टरमध्येच फळबाग लागवड

१ हजार ११० हेक्टरमध्येच फळबाग लागवड

जितेंद्र दखणे अमरावती
रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विभागात एक हजार ११० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांच्या अनुदानाचे वितरण कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यात केल्याची माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली.
विभागात मागील दोन वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कृषी विभागाने फळबाग लागवडीचे १ हजार ११० हेक्टरचे उद्दिष्ट्य ठेवत लागवडीचे नियोजन केले होते. परंतु जून-जुलैमध्ये वेळेवर पाऊस न झाल्याने फळबाग लागवडीला उशिरा सुरुवात झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी संत्रा, डाळिंब, मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली.
त्यापाठोपाठ काही ठिकाणी आंबा, सीताफळ आदी फळबागांची लागवड केली आहे. औषधी वनस्पतींची मात्र अल्पप्रमाणात लागवड झाली आहे. यावर ४९०.०५ लाख रूपयांचा निधी खर्च झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Horticulture is planted in 1,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.