प्रफुल हेलोडेंना उद्यानपंडित पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST2021-04-03T04:12:13+5:302021-04-03T04:12:13+5:30
मोर्शी : कृषी व फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित पुरस्कार-२०१८ मोर्शी तालुक्यातील शेतकरी प्रफुल्ल गणपतराव हेलोडे ...

प्रफुल हेलोडेंना उद्यानपंडित पुरस्कार
मोर्शी : कृषी व फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित पुरस्कार-२०१८ मोर्शी तालुक्यातील शेतकरी प्रफुल्ल गणपतराव हेलोडे यांना घोषित झाला आहे.
प्रफुल्ल हेलोडे यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केले. रसायनमुक्त शेती करण्यासाठी बायो फर्टिलायझरचा उपयोग शेतात केला. त्यांनी मिर्ची, ....... अॅशगारड, टमाटर, गोबी, टरबूज, खरबूज, काकडी, आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले. शेतकऱ्यांना दर्जेदार भाजीपाला रोप उपलब्ध होत नव्हती. त्यासाठी हेलोडे यांनी द्वारका नर्सरीची सुरवात केली. त्याद्वारे संपूर्ण विदर्भात दर्जेदार व किफायतशीर दरात भाजीपाला रोपे उपलब्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मल्चिंग यंत्रे, फवारणी यंत्रे तयार करून घेतली आहेत.