शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

संस्कार लॉनमधील हुक्का पार्लरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 10:33 PM

शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला होता; ....

ठळक मुद्देकसबाच्या मालकावर गुन्हा : पोलीस आयुक्तांच्या ‘नाईट राऊंड’मध्ये पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला होता; मात्र, विद्यापीठ मार्गावरील कसबा हुक्का पार्लरच्या संचालकाने त्याच्याच संस्कार लॉनमध्ये हुक्का पार्लर सुरू ठेवले होते. शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नाईट राऊंडमध्ये या हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी कसबा पार्लरचा मालक गौरव खंडेलवालविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.संस्कार लॉनमध्ये हुक्का पिणाºया सहा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन मुलींनी लॉन परिसरातून पलायन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ऋषिकेश खेडकर, कमलेश तायडे, अजय इंगोले, आशिष जाधव, रोहित जोशी व मो.आफिक अब्दुल कलीम अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत. पोलिसांनी संस्कार लॉनमधून दोन हुक्के, शेगडी व फ्लेवरचे डब्बे जप्त केले आहेत. सध्या गौरव खंडेलवाल हा पसार झाला आहे.शहरातील गुन्हेगारीवर वचक बसावा व पोलिसांच्या कामात तत्परता यावी, याउद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरात रात्र गस्त सुरू केली. शहरातील संवेदनशील परिसरात पायी फिरून सीपी स्वत: गस्त घालत असल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून अनेक अपराधिक घटनांचा पर्दाफाश होत आहे. शनिवारी पोलीस आयुक्तांनी काँग्रेसनगर परिसराची झाडाझडती घेतली. त्यानंतर चपराशी पुºयानजीकच्या कॅम्प कार्नरवरील पानटपरीजवळ त्यांना वाहनांचे अनधिकृत व अस्तव्यस्त पार्किंग आढळून आले. यानंतर सीपींनी शासकीय विश्रामगृहानजीकच्या परिसराकडे मोर्चा वळविला. त्याठिकाणी एका शानदार हॉटेलसमोर रस्त्यावर त्यांना चारचाकी वाहनांची गर्दी दिसून आली.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी हॉटेल मालकाला बोलावून अस्तव्यस्त पार्किंगसंदर्भात तंबी दिली. त्यानंतर सीपींच्या आदेशाने बियाणी चौकातील पानटपरीवर सिगारेट पिणाºयांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तत्पश्चात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विद्यापीठ मार्गावर फेरफटका मारला असता संस्कार लॉनमध्ये काही तरूण-तरूणी हुक्का पिताना गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलिसांच्या हवाली केले.लॉनमध्ये अश्लील चाळेकसबा हुक्का पार्लरच्या मालकाने संस्कार लॉनमध्ये पुन्हा हुक्का पार्लर सुरू केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले, तर दोन तरुणी पळून गेल्या. त्यामुळे याठिकाणी हुक्का पिताना अश्लील चाळेसुध्दा होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आला आहे.स्टंट रायडर्सच्या पालकांना तंबीसीपींच्या नाईट राऊन्डदरम्यान कसबा कॅफे व संस्कार लॉनबाहेर मोटरसायकल अस्तव्यस्त स्थितीत पार्क केल्याचे आढळून आले. पोलिसांनी नो-पार्किंगची व्हॅन बोलावून १७ गाड्या जप्त केल्या. त्यामध्ये सर्वाधिक वाहने ही स्टंट रायडर्सची होती. वाहतूक नियमांप्रमाणे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून स्टंट राईडर्सच्या पालकांना बोलावून तंबी देण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांना अधिकाºयांना दिल्या. पोलिसांनी वाहनाचालकांजवळ दस्तऐवज तपासून गाड्या गाडगेनगर व वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केल्या.