संस्कार लॉनमधील हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:40 IST2017-09-03T22:33:51+5:302017-09-03T22:40:45+5:30
शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला होता; ....

संस्कार लॉनमधील हुक्का पार्लरवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला होता; मात्र, विद्यापीठ मार्गावरील कसबा हुक्का पार्लरच्या संचालकाने त्याच्याच संस्कार लॉनमध्ये हुक्का पार्लर सुरू ठेवले होते. शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नाईट राऊंडमध्ये या हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी कसबा पार्लरचा मालक गौरव खंडेलवालविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
संस्कार लॉनमध्ये हुक्का पिणाºया सहा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन मुलींनी लॉन परिसरातून पलायन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ऋषिकेश खेडकर, कमलेश तायडे, अजय इंगोले, आशिष जाधव, रोहित जोशी व मो.आफिक अब्दुल कलीम अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत. पोलिसांनी संस्कार लॉनमधून दोन हुक्के, शेगडी व फ्लेवरचे डब्बे जप्त केले आहेत. सध्या गौरव खंडेलवाल हा पसार झाला आहे.
शहरातील गुन्हेगारीवर वचक बसावा व पोलिसांच्या कामात तत्परता यावी, याउद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरात रात्र गस्त सुरू केली. शहरातील संवेदनशील परिसरात पायी फिरून सीपी स्वत: गस्त घालत असल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून अनेक अपराधिक घटनांचा पर्दाफाश होत आहे. शनिवारी पोलीस आयुक्तांनी काँग्रेसनगर परिसराची झाडाझडती घेतली. त्यानंतर चपराशी पुºयानजीकच्या कॅम्प कार्नरवरील पानटपरीजवळ त्यांना वाहनांचे अनधिकृत व अस्तव्यस्त पार्किंग आढळून आले. यानंतर सीपींनी शासकीय विश्रामगृहानजीकच्या परिसराकडे मोर्चा वळविला. त्याठिकाणी एका शानदार हॉटेलसमोर रस्त्यावर त्यांना चारचाकी वाहनांची गर्दी दिसून आली.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी हॉटेल मालकाला बोलावून अस्तव्यस्त पार्किंगसंदर्भात तंबी दिली. त्यानंतर सीपींच्या आदेशाने बियाणी चौकातील पानटपरीवर सिगारेट पिणाºयांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तत्पश्चात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विद्यापीठ मार्गावर फेरफटका मारला असता संस्कार लॉनमध्ये काही तरूण-तरूणी हुक्का पिताना गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलिसांच्या हवाली केले.
लॉनमध्ये अश्लील चाळे
कसबा हुक्का पार्लरच्या मालकाने संस्कार लॉनमध्ये पुन्हा हुक्का पार्लर सुरू केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले, तर दोन तरुणी पळून गेल्या. त्यामुळे याठिकाणी हुक्का पिताना अश्लील चाळेसुध्दा होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आला आहे.
स्टंट रायडर्सच्या पालकांना तंबी
सीपींच्या नाईट राऊन्डदरम्यान कसबा कॅफे व संस्कार लॉनबाहेर मोटरसायकल अस्तव्यस्त स्थितीत पार्क केल्याचे आढळून आले. पोलिसांनी नो-पार्किंगची व्हॅन बोलावून १७ गाड्या जप्त केल्या. त्यामध्ये सर्वाधिक वाहने ही स्टंट रायडर्सची होती. वाहतूक नियमांप्रमाणे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून स्टंट राईडर्सच्या पालकांना बोलावून तंबी देण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांना अधिकाºयांना दिल्या. पोलिसांनी वाहनाचालकांजवळ दस्तऐवज तपासून गाड्या गाडगेनगर व वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केल्या.