शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

कोल्हा ठरला काळ; भीषण अपघातात बाप-लेक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 11:38 IST

राजना फाट्याजवळ भीषण अपघात, कोल्ह्याचाही मृत्यू

चांदूर रेल्वे (अमरावती): तालुक्यातील सोनोरा भिलटेक येथून वर्धेला स्थायिक झालेल्या तायडे कुटुंबातील बापलेक चांदूर रेल्वे ते देवगाव रस्त्यावरील राजना फाट्याजवळ भीषण अपघातात ठार झाले. यात वडिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर मुलगा अमरावतीत उपचारादरम्यान दगावला. ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी ते येत होते.

पोलिस सूत्रांनुसार, प्रभाकर तायडे (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा दिनेश प्रभाकर तायडे (३०) असे उपचारादरम्यान दगावलेल्या मुलाचे नाव आहे. मूळचे सोनोरा येथील रहिवासी आणि आता वर्धा येथे स्थायिक झालेले हे तायडे पितापुत्र एमएच ३२ बी ५९४१ क्रमांकाच्या वाहनाने वर्धा येथून भिलटेक येथे दर्शनासाठी येत होते. चांदूर रेल्वे शहरापासून जवळच असलेल्या देवगाव-चांदूर रेल्वे रस्त्यावरील राजना फाट्याजवळील वीटभट्टीजवळ कोल्हा आडवा आल्यामुळे दिनेशचे दुचाकीवरील संतुलन बिघडले आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच २७ एआर २९२७ क्रमांकाच्या दुचाकीला भिडले.

धडकेनंतर रस्त्यावर कोसळून प्रभाकर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दिनेशला चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून अमरावतीला हलविण्यात आले. तेथे त्याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. चांदूर बाजार पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होऊन ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. दरम्यान, तायडे पिता-पुत्राच्या दुचाकीा आडवा गेलेला कोल्हादेखील ठार झाला.

ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर

अपघात झाल्यानंतर जमलेल्या गर्दीपैकी काहींनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी दिनेशला चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे अर्ध्या तासापर्यंत रुग्ण उपचाराविना होता. अर्ध्या तासानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसकोल्हे आले. त्यांनी तातडीने जखमीवर प्रथमोपचार करून अमरावतीला रेफर केले. हा वेळ वाचविता आला असता, तर कदाचित दिनेशचे प्राण वाचू शकले असते, असे बोलले जात आहे.

दर्शनाची आस अधुरी

भिलटेक या पूर्वापर गावी नुकतीच यात्रा होती. त्याला उपस्थित राहता आले नाही म्हणून तायडे पिता-पुत्र गुरुवारी वर्ध्याहून दर्शनाला निघाले होते.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती