शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अघोरी प्रकार! मेळघाटात चिमुकल्याला दिले तप्त विळ्याचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:28 IST

राम संजू तोटा नामक या चिमुकल्यास पोटफुगीचा त्रास होता. रामच्या पालकांनी उपकेंद्र किंवा डॉक्टरांना न दाखविता त्याला गावातील भूमकाकडे नेले. या भूमकाने चुलीत तप्त केलेल्या विळ्याचे चटके त्याच्या संपूर्ण शरीरावर दिले.

ठळक मुद्देअघोरी प्रथा, डॉक्टरांची पोलिसांत तक्रार महिला-बाल कल्याण मंत्र्यांकडून गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरेअमरावती : मेळघाटात अंधश्रद्धेतून उद्भवणाऱ्या अघोरी प्रथेला आठ महिन्यांचे बालक बळी पडले. पोटफुगीचा उपचार म्हणून त्याच्या पोटाला तप्त विळ्याचे चटके देण्यात आले. बोरदा गावात हा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. या संतापजनक प्रकरणात काटकुंभ आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी संबंधित भूमका (मांत्रिक) विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. पालकमंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात गंभीर दखल घेतली.राम संजू तोटा नामक या चिमुकल्यास पोटफुगीचा त्रास होता. नेहमीप्रमाणे होते तसे या प्रकरणातही रामच्या पालकांनी उपकेंद्र किंवा डॉक्टरांना न दाखविता त्याला गावातील भूमकाकडे नेले. या भूमकाने चुलीत तप्त केलेल्या विळ्याचे चटके त्याच्या संपूर्ण शरीरावर दिले. त्यामुळे पोटापासून मानेपर्यंत शरीर भाजले आहे. हा प्रकार तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती होताच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांना कळविले. धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांना बोरदा गावात पाठविले. त्या चिमुकल्यास तेथून चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या कृत्याबद्दल चिखलदरा पोलीस ठाण्याच्या काटकुंभ पोलीस चौकीत वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी तक्रार दाखल केली.चिमुकल्या रामच्या पालकांनी उपचार करणाऱ्या भूमकाचे नाव सांगण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यांचे मानाचे स्थान व त्यातून निर्माण झालेला दबदबा ही कारणे यामागे आहेत. यापूर्वीसुद्धा असेच प्रकरण उघडकीस आणणारे काटकुंभ येथील काँग्रेस पदाधिकारी पीयूष मालवीय यांनी भूमकाविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियमांतर्गत कारवाईची मागणी केली आहे.विधानसभेत गाजला होता मेळघाटचा डंबा‘लोकमत’ने ‘मेळघाटचा अघोरी डंबा’ सर्वप्रथम उघडकीस आणला होता. २०१५ मध्ये याच डंब्याची तत्कालीन आमदार तथा विद्यमान महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दखल घेऊन विधानसभेत तारांकित प्रश्न मांडला होता. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मेळघाटातील या मांत्रिकांसाठी मानधन व प्राथमिक वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याचे सदर घटनेने उघड केले. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सकाळीच संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.चुरणी रुग्णालयात उपचारडॉ. अजय ठोसर, डॉ. मोनिका अठोले, परिचारिका स्मिता राऊत, आरोग्य सेवक सतीश तायडे, सुभाष ठाकरे, रामबाई तांडीलकर, चालक राहुल येवले, फुला कासदेकर, संतोष बेलकर आदींच्या पथकाने गुरुवारी दुपारी २ वाजता चिमुकल्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार करीत दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.बोरदा येथील आठ महिन्याच्या चिमुकल्याला पोटफुगीच्या उपचारासाठी भूमकाने तप्त विळ्याच्या डागण्या दिल्या. त्याला तत्काळ उपचारार्थ आणण्यात आले. पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रमेळघाटातील हा गंभीर प्रकार आहे. त्याची मी स्वत: दखल घेतली आहे. आदिवासींनी असा जीवघेणा प्रकार करू नये, यासंदर्भात जनजागृती व त्यांना आरोग्यसेवेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत. बाळावर उपचार होत आहेत.- यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्रीबोरगाव येथील बालकाला चटके दिल्याच्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशी आरंभली आहे.- आकाश शिंदे, ठाणेदार, चिखलदरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMelghatमेळघाट