शोध बचाव पथकातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्या
By Admin | Updated: June 30, 2015 00:20 IST2015-06-30T00:20:49+5:302015-06-30T00:20:49+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यरत १४ कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१४ पासून ...

शोध बचाव पथकातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्या
तिढा : १४ कर्मचाऱ्यांची सामूहिक मागणी
अमरावती : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यरत १४ कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१४ पासून सुमारे १ लाख ९० हजार ४०० रूपयांचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित देण्यात यावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोमवारी घातले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महापूराची स्थिती निर्माण झाली होती.यामुळे ही परिस्थिती हाताळण्यासाठी गृहरक्षक दलातील १४ सैनिकांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या नियंत्रण कक्षात २४ तास कर्तव्यावर ठेवण्यात आले.त्यांनी ३४ दिवस काम केले आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांना प्रति व्यक्ती ४०० रूपयाप्रमाणे, १३ हजार ६०० रूपये मानधन अद्यापही जिल्हा प्रशासनाने अदा केले नाही ते त्वरित देण्यात, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांच्याकडे केली आहे. यावेळी राजेंद्रसिंग बघेल, प्रदीप बद्रे, आनंदसिंह ठाकूर, अजय आसोले, शशांक दुबे, सुधीर गडलिंग, प्रफुल्ल भुसारी, राजेंद्र शाहाकार, मंगेश सोळेके, वाबुलाल सूर्यवंशी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)