शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

कर्णकर्कश हॉर्न बिनदिक्कत वाजतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:11 AM

विनाहेल्मेट, नोपार्किंगमधील वाहनांवर मोठी कारवाई : दंडाचा एकूण आकडा १.७९ कोटींवर असाईनमेंट प्रदीप भाकरे अमरावती : कानाला इजा पोहोचविणारे ...

विनाहेल्मेट, नोपार्किंगमधील वाहनांवर मोठी कारवाई : दंडाचा एकूण आकडा १.७९ कोटींवर

असाईनमेंट

प्रदीप भाकरे

अमरावती : कानाला इजा पोहोचविणारे कर्णकर्कश हॉर्न शहरात बिनदिक्कतपणे वाजतात. मात्र, जेथे ते वाजविले जातात, तेथे नेमके पोलीस नसल्याने अशा हुल्लडबाज वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे. वाहतूक पोलीस कारवाई करतील, या भीतीने मुख्य चौकातून ते वाहनचालक मुकाट जातात. मात्र, महाविद्यालय, शाळा दिसल्यास नेमका हॉर्न वाजविला जातो.

गतवर्षी मार्चपासूनच शाळा महाविद्यालयांना टाले लागल्याने ‘कर्णकर्कश तथा म्युझिकल हॉर्न’ वाजवून ‘इम्प्रेस’ करायचे तरी कुणाला, असा प्रश्न हुल्लडबाजांना पडला. परिणामी, सन २०२० मध्ये अवघ्या २७, तर मे २०२१ पर्यंत ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे गतवर्षीसह यंदा देखील कित्येक महिने लॉकडाऊन असताना, अकारण फिरण्यास बंदी असतानादेखील वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १ कोटी ७९ लाख ४३ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ८७ हजार ९०१ प्रकरणांमधून १ कोटी ११ लाख ६ हजार ८५० रुपये, तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ६६ हजार ३१ वाहनचालकांकडून ६७ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील सर्वाधिक दंड वसूल झाला तो नो पार्किगमधील वाहनांतून.

बॉक्स

इतक्या वाहनचालकांवर झाली कारवाई

कारवाईचा प्रकार २०२० - २०२१ (मेपर्यंत)

सिग्नल तोडला - ३४०- १५६४

नो पार्किंग - ८९४१- ४३५७

हेल्मेट नाही - ३१- १५

कर्णकर्कश हॉर्न- २७- ३४

-----------

सन - एकूण प्रकरणे - दंड (रुपये)

२०२० -८७, ९०१ - १, ११, ६१८५०

२०२१- ६६, ०३१ - ६७, ८२,०००

------------

वाहतूक पोलीस प्रमुख म्हणाले

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर निरंतर कारवाई सुरू आहे. कोरोना काळातही वाहतूक शाखेने सर्वाधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची ती रक्कम सुमारे १ कोटी ७९ लाखांच्या जवळपास आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे.

- किशोर सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त

शहर वाहतूक

----------------

कानाचेही आजार वाढू शकतात

ध्वनीप्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम अतिशय गंभीर आहेत. त्यात

ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे. झोपेत सतत बिघाड होणे, अस्वस्थता वाटणे, वेदना होणे वा थकवा येणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यामध्ये अडथळा येणे, हार्मोन्समध्ये बदल होण्याचा समावेश आहे. कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो व दैनंदिन जीवनामध्ये अडथळा आणतो, त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम कानावर होतो.

------------

म्युझिकल हॉर्नची फॅशन

शहरातील नवतरुण आपल्या महागड्या दुचाकींना ‘म्युझिकल हॉर्न लावतात. सध्या शहरात त्याची क्रेझ दिसून येत आहे. आपण कसे वेगळे आहोत, लावलेला हॉर्न किती महागडा आहे. त्यावर ही फॅशन दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. सोबतच प्रेशर हॉर्न, बुलेट हॉर्न, सायरन हॉर्नदेखील पहायवास मिळतो.

-----

कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार शांतता झोन असलेल्या परिसरात ५० डेसिबल, निवासी झोन परिसरात ५५ डेसिबल, वाणिज्य झोन परिसरात ६५ डेसिबल, तर औद्योगिक झोन परिसरात ७५ डेसिबलपेक्षा कमी ध्वनिपातळी ठेवणे आवश्यक आहे. कारवाईत दोषी आढळल्यास वाहनचालकांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात येणार आहे. तर, कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्याच्या कलम ११९/२३० नुसार कारवाई केली जाते.

----------