स्तन कर्क रोगावर करता येतो होमिओपॅथीने उपचार

By Admin | Updated: March 8, 2017 00:08 IST2017-03-08T00:08:59+5:302017-03-08T00:08:59+5:30

भारतात सर्वसाधारणत: ३० महिलांंमागे ३ स्त्रीयांना स्तनाच्या कर्करोग होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

Homeopathy Treatment with Homeopathy | स्तन कर्क रोगावर करता येतो होमिओपॅथीने उपचार

स्तन कर्क रोगावर करता येतो होमिओपॅथीने उपचार

जागतिक महिला दिन : डॉक्टरांचा विश्वास
अमरावती : भारतात सर्वसाधारणत: ३० महिलांंमागे ३ स्त्रीयांना स्तनाच्या कर्करोग होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. पाश्चिमात्यांचे अनुकरण , राहणीमान, सुखसोयी यामुळे या आजाराचे प्रमाण वाढले आहे. स्तनाच्या कर्क रोगावर अनेक प्रभावी उपचारपद्धती असल्या तरी होमिओपॅथी उपचारपद्धतीने स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो, असा विश्वास होमिओपॅथी डॉक्टरांना आहे.
आजच्या काळातील करिअर वूमन, घरची जबाबदारी, मुलांचा सांभाळ करीत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले असल्याचे मत डॉक्टर नोंदवीत आहेत.
'मॅनोपॉक' व्यतिरिक्त साधारणत: ७० ते ८० टक्के विकार हे कर्करोगाव्यतिरिक्त असतात. स्तनात गाठ असणे म्हणजे स्तनाचा कर्करोग झाला असेही नाही. परंतु, या गाठींचे निदान होणे गरजेचे आहे.

ही आहेत लक्षणे
अमरावती : स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमुख कारणांमध्ये, पहिले मूल उशिरा होणे, एकही मूल न होणे, मुलांना स्तनपान न करू देणे, ॠ तू समाप्तीनंतरची स्थुलता आदी कारणे आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये वेदना विरहित गाठ, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनावरील त्वचेवर खळी पडणे, रोगाचे प्रमाण वाढल्यास काखेत किंवा मानेत गाठ येणे, स्तनावरील त्वचा संत्र्याच्या सालीसारखी जाड होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. कर्करोगाचा फैलाव फुफ्फुस हाडे, यकृत या भागात झाल्यावर त्यातून रोगमुक्तता शक्य नसते. यामुळे सुरुवातीपासूनच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबातील आई, मावशी, आजी (आईची आई) किंवा बहिणीला कर्करोग झाला असल्यास याचा धोका संभावतो. निदान करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी, मेमोग्राफी आणि सूक्ष्मसुई परीक्षण करता येते. अ‍ॅलोपथीसह होमिओपॅथी उपचारातून कर्करोगावर नियंत्रण मिळविता येते. होमिओपॅथी उपचाराने असा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारात रुग्णाचा शारीरिक, मानसिक अभ्यास करून औषधांचे प्रमाण व मात्रा ठरविण्यात येते.

होमिओपॅथीचे उपचार सिद्ध झालेले
जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्र मांतून महिलांच्या कर्तृत्त्वाचा पुरस्कार केला जात आहे. मात्र मागील काही वर्षांत महिलांच्या आरोग्यविषयक स्थितीचा आढावा घेतल्यास स्तनाचा कर्करोग वाढल्याचे दिसते. स्तनाच्या कर्करोगावर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करता येतात, हे सिद्ध झाले आहे. आता लोकांनी यावर विश्वास ठेवायला हवा. स्वपरीक्षण (मेमोग्रॅफी) करूनही स्वत:च स्तन कर्करोग असल्याची तपासणी करता येत असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ज्ञ अश्विनी वानखडे यांनी दिली.

Web Title: Homeopathy Treatment with Homeopathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.