गृहमंत्र्यांनी घेतली मानसकन्येच्या घरी दिली सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:22 IST2021-02-06T04:22:20+5:302021-02-06T04:22:20+5:30

फोटो - आर ०५ परतवाडा : स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहातील वर्षा या मुलीच्या विवाह सोहळ्यात तिचे मानसपिता ...

The Home Minister paid a goodwill visit to Manasakanya's house | गृहमंत्र्यांनी घेतली मानसकन्येच्या घरी दिली सदिच्छा भेट

गृहमंत्र्यांनी घेतली मानसकन्येच्या घरी दिली सदिच्छा भेट

फोटो - आर ०५

परतवाडा : स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहातील वर्षा या मुलीच्या विवाह सोहळ्यात तिचे मानसपिता बनून कन्यादान करणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती दौऱ्यात तिच्या घरी परतवाडा येथे सदिच्छा भेट दिली. तिचा विवाह याच संस्थेत लहानाचा मोठा झालेला समीर या युवकाशी झाला आहे. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी या दोन्ही मूकबधिर मुलामुलींचे संगोपन केले आहे.

गृहमंत्र्यांच्या मानसकन्येशी विवाहबद्ध झालेल्या समीरचे पालकत्व नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वीकारले होते. २० डिसेंबर २०२० रोजी त्यांचे नागपूर येथे लग्न झाले. त्यानंतर एक महिन्याने अमरावती दौऱ्यात गृहमंत्र्यांनी परतवाडा गाठले. त्यांच्याकडे चहापान केले. वडिलांच्या मायेने वर्षाची त्यांनी चौकशी केली व सुखी संसाराचा आशीर्वाद दिला. याप्रसंगी तिची ओटी भरण्यात आली.

Web Title: The Home Minister paid a goodwill visit to Manasakanya's house